समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी
ADVERTISEMENT
मागील तीन महिन्यांपासून आपल्या फॅक्टरीमध्ये काम करून घेतल्यानंतरही पगार देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मालकाची बाईक मजुराने भर रस्त्यात जाळली. या प्रकरणी पोलिसांनी या मजुराला बेड्या ठोकल्या आहेत.
गाडी मालक मनोज गणेश पाटील यांनी या प्रकरणाबाबत चिंचवड़ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. तेव्हा या तक्रारीची दख़ल घेत चिंचवड पोलिसांनी भर रस्त्यात गाडी जाळणारा 27 वर्षीय मजूर अंकित सिंह यादव याला अटक केली आहे.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी मनोज पाटील यांच्या फॅक्टरीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून अंकित यादव हा मजुरी करत होता. मागील तीन महिन्यांपासून मनोज यांनी अंकित याला पगारच दिला नाही. त्यावर अनेक वेळा अंकित याने मनोज यांच्याकडे पगाराची मागणी केली पण कुठलेही समाधान कारक उत्तर न मिळाल्याने अंकितला याचा राग आला आणि त्याने दारूच्या नशेत ही माहिती मिळवली की आपले मालक मनोज पाटील सध्या कुठे आहेत? त्यानंतर तो चिंचवड लिंक रोड येथे आला असता तेथे त्याला पाटील यांची हिरो होंडा डिलक्स ही गाडी रस्त्यावर अभी असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर अंकित याने गाडी जवळ जाऊन पेट्रोलचा पाईप ओढला आणि आपल्या सोबत आणलेली काडीपेटीतील एक काडी पेटवून भर रस्त्यात पाटील यांच्या गाडीला आग लावून तो पसार झाला.
पाहता पाहता पूर्ण गाडीही रस्त्यातच भस्मसात झाली या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी आपल्या मोबाईल फोन कॅमेरात कैद झाला आहे. तसंच या परिसरातील दुकानांच्या बाहेर सुरक्षेच्या हेतूने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्येही या संपूर्ण घटनेचा थरार रेकॉर्ड झाला आहे.
ADVERTISEMENT