महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे आता राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू केले जातील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर काही कठोर निर्बंध आणावेच लागतील. राज्यातील किराणा दुकानं सकाळी सात ते अकरा अशी चार तासच सुरू ठेवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. अनेक लोक किराणा आणायचा आहे हे कारण देऊन विनाकारण फिरताना दिसतात. त्यांना आडकाठी करायची असेल तर हे करावंच लागेल या अनुषंगाने आमची चर्चा झाली अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. किराणा दुकानांच्या संदर्भातली ही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हे आणखी कठोर केले पाहिजेत. राज्यात कठोर निर्बंध असतानाही अनेक लोक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आणखी कठोर निर्णय घ्यावेच लागलीत. जिल्हा स्तरावरही याबाबत निर्णय घेतले जावेत अशीही चर्चा मंत्र्यांची झाली. दुर्गम भागातील जिल्ह्यात जिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांचा रोज मंत्रालयाशी संबंध येत नाही तिथे पालक सचिवांनी जास्त सक्रिय राहून काम केलं पाहिजे त्यांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण कसं मिळवता येईल त्याविषयीही चर्चा झाल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही बाब सांगितली.
राज्यात ऑक्सिजनची मोठी मागणी होते आहे. दररोज 1250 मेट्रिक टन हे उत्पादन आपण सध्या रोज वापरत आहोतच. पण त्याचप्रमाणे साधारणपणे 300 मेट्रिक टन हे बाहेरून आणतो आहोत. बिराई, भिलाई, विशाखापट्टणम येथून ट्रेनने लिक्विड ऑक्सिजन आणण्याची संमती मिळालेली आहे. त्यामुळे ओपन वॅगनवर टँकर चढवून ते आणण्याचा निर्णयही झाला आहे. 300 मेट्रिक टन हा कोटाही महाराष्ट्र आणतो आहे. रोज 1550 मेट्रिक टन इतका वापर आहे असंही त्यांनी सांगितलं. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनचा तुटवडा आणखी वाढू शकतो असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. यापुढे आपण कलेक्टर्सनी दोन टेक्नॉलॉजी एक आहे PSA टेक्नॉलॉजी आणि एक ASU टेक्नॉलॉजी आहे या दोन्हीमुळे हवेतून ऑक्सिजन निर्माण करता येऊ शकतो. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन कनव्हर्ट करता येईल याचा वापर करण्याचेही आदेशही देण्यात आले आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT