Nadav Lapid : “द कश्मीर फाईल्स अश्लील आणि प्रचारकी चित्रपट; केंद्रीय मंत्र्यासमोर IFFI च्या ज्युरी हेडची टीका

मुंबई तक

• 02:53 AM • 29 Nov 2022

कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातच द कश्मीर फाईल्स वर अश्लील आणि प्रचारकी चित्रपटाचा ठपका ठेवण्यात आलाय. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांसमोर हे मत मांडलं. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातच द कश्मीर फाईल्स वर अश्लील आणि प्रचारकी चित्रपटाचा ठपका ठेवण्यात आलाय. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांसमोर हे मत मांडलं.

हे वाचलं का?

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या वतीने 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात करण्यात आले होते. या चित्रपट महोत्सवात नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपट अश्लील आणि प्रोपगंडा असल्याचं म्हटलंय.

द कश्मीर फाईल्स अश्लील आणि प्रोपगंडा… नदाव लॅपिड नक्की काय म्हणाले?

IFFI मध्ये बोलताना नदाव लॅपिड म्हणाले, “द कश्मीर फाईल्स चित्रपट बघून आम्हाला धक्का बसला आणि व्यथित आहोत. हा चित्रपट आम्हाला अश्लील आणि प्रचारकी वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवासाठी हा (द कश्मीर फाईल्स) चित्रपट योग्य नाही. मी माझ्या भावना तुमच्यासोबत खुलेपणाने बोलू शकतोय, कारण आपण सगळे इथे टीकेचाही स्वीकार करतो आणि चर्चा करतो.”

“या चित्रपट महोत्सवात डेब्यू कॉम्पिटिशन प्रकारात 7 चित्रपट बघितले आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन प्रकारात 15 चित्रपट बघितले. यापैकी 14 चित्रपट सिनेमॅटिक फीचर्सवर आधारित होते. द कश्मीर फाईल्स या 15 व्या चित्रपटाचा समावेश आम्हा सगळ्यांना त्रासदायक आणि आश्चर्यचकीत करणारा होता”, असं म्हणत त्यांनी द कश्मीर फाईल्सचा चित्रपट महोत्सवात समावेश केल्यावरून नाराजी व्यक्त केली.

अशोक पंडित यांनी नदाव यांच्या विधानावर व्यक्त केली नाराजी

नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपट अश्लील प्रोपगंडा असल्याचं म्हटल्यानंतर त्यांच्या विधानाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यांच्या या मतानंतर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी टीका केलीये.

अशोक पंडित म्हणाले, ‘चित्रपटाबद्दल नदाव लॅपिड यांनी वापरलेल्या भाषेला माझा तीव्र आक्षेप आहे. 3 लाख कश्मिरी हिंदूंचा नरसंहार चित्रित करण्याला अश्लील म्हटलं जाऊ शकत नाही. मी एक कश्मिरी पंडित म्हणून या निर्लज्ज विधानाचा निषेध करतोय”, अशी भूमिका अशोक पंडित यांनी मांडलीये.

चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनीही नदाव लॅपिड यांच्या विधानावर टीका केलीये. “झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो, सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है”, असं ट्विट खेर यांनी केलंय.

दुसरीकडे नदाव लॅपिड यांच्या भाषणाचा व्हिडीओ अनेक राजकीय नेत्यांकडून शेअर करण्यात आला आहे. अनेक नेत्यांनी नदाव लॅपिड यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांनीही नदाव लॅपिड यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नदाव लॅपिड यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, ‘कश्मिरी पंडितांच्या न्यायाच्या एका संवेदनशील मुद्द्याला प्रचाराच्या वेदीवर बळी चढवलं गेलं.’

द कश्मीर फाईल्सवरून राजकारण तापणार

द कश्मीर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी हेडने द कश्मीर फाईल्स वर अश्लील आणि प्रोपगंडा आधारित चित्रपट असल्याचं म्हटल्यानं विरोधक आणि सत्ताधारी यांच्या पुन्हा शाब्दिक वाद पेटण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp