MSRTC Employee Ask 7th Pay Commission : धाराशीव/ कळंब : सातवा वेतन आयोग (7th Pay Commission ) एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा, या मागणीसाठी धाराशिव येथील कळंब आगाराचा एक कर्मचारी गळ्यात फास अडकवून टॉवरवर चढला आहे. आज अधिनेशनात (Assembly Session) काय तो न्याय द्या, अन्यथा मी आत्मदहन (Suicide) करणार, असा इशाराच या कर्मचाऱ्याने दिला आहे. (Sacchidanand Puri ) सच्चिदानंद पुरी, असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही. म्हणून मी आज हे पाऊल उचलले आहे . माझ्या जिवाचे काही बरं वाइट झाले तर मला कोणीही श्रद्धांजली अर्पण करू नये, अशी भूमिका त्याने घेतली आहे. The ST employee climbed the tower with a noose around his neck
ADVERTISEMENT
ST Strike: …म्हणून एसटी कर्मचारी हातात बांगड्या घालून कामावर आला!
गेल्यावर्षी एसटी महामंडळ शासनात विलीन करावं या मागणीसाठी राज्यभर संप पुकारण्यात आला होता. त्या दरम्यान देखील हा कर्मचारी अशाचप्रकारे गळ्यात फास अडकवून झाडावर चढला होता. आता विलीनीकरणाचा प्रश्न कोर्टात आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी सच्चिदानंद पुरी कळंब शहरातील 100 फुट उंच बीएसएनएलच्या टॉवरवर चढला आहे. धुर्त राजकारणी आणि कर्मचारी संघटनांमुळे एसटी कर्मचाऱ्यांचं नुक्सान होत आहे, असं कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.
राजकीय नेते मंडळी आणि एसटी कर्मचारी संघटना एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताशी त्यांना काही देणंघेणं नाही. त्यांना फक्त आपल्या संघटना जिवंत ठेवायच्या आहेत. आज मेल्यासारख्या जिर्ण अवस्थेत या संघटना झाल्या आहेत. संघटना म्हटलं की ते नेत्यांचे गुलाम असतात, पुढाऱ्यांच्याप्रमाणे चलतात, असा आरोप या कर्मचाऱ्याने केला आहे. राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर या संघटना चालत आहेत. तात्कालीन सरकार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यायला तयार होते, मात्र या संघटनांनी मधला मार्ग काढला आणि सातवा वेतन आयोग गेला, असा दावा कर्मचारी पुरी याने केला आहे. पुढे आरोप करत सच्चिदानंद पुरी याचं म्हणणं आहे की, नावाला आदोलनं पुकारली जातात, परंतू सरकार त्यांचंच,आमदार त्यांचेचं आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संघटना पण त्यांच्याच. म्हणजे विरोधकांनी कुठे आवाज उठवू नये, असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.
बीड : परळी आगारात ST चालकाकडून विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
न्याय मिळाला नाही तर मी लटकलेला दिसेल : पुरी
124 कर्मचारी शहिद झाले आहेत. शहिद झालेल्या कर्मचाऱ्यांचे आत्मे मला झोपू देत नाहीत. मी खूप व्यथित झालो आहे. काल परत एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, अन्यथा मी याठिकाणी लटकलेला दिसेल. ही तुमच्या लोकशाहीची हार असणार आहे, राज्यकर्त्यांना दिलेली ही चपराक असणार आहे, असं सच्चिदानंद पुरी सांगत आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यावे घेतली आहे.
ADVERTISEMENT