कोरोना काळात Dolo 650 ही गोळी सर्वाधिक का विकली गेली? सत्य आले समोर

मुंबई तक

• 07:51 AM • 19 Aug 2022

कोरोनाच्या महामारीत डोलो 650 नावाची गोळी मोठ्याप्रमाणात विकली गेली. डॉक्टरांनी ताप कमी करण्यासाठी मोठ्याप्रमाणात ही गोळी लिहून दिली. लोकांनी मोठ्याप्रमाणात या गोळीच सेवन केलं आहे. आता पुन्हा एक ही गोळी आणि गोळी बनवणारी कंपनी चर्चेत आली आहे. डॉक्टर ही गोळी का लिहून देत होते, याचे कारण आता समोर आले आहे. या कारणांमुळे डॉक्टर Dolo 650 […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

कोरोनाच्या महामारीत डोलो 650 नावाची गोळी मोठ्याप्रमाणात विकली गेली. डॉक्टरांनी ताप कमी करण्यासाठी मोठ्याप्रमाणात ही गोळी लिहून दिली. लोकांनी मोठ्याप्रमाणात या गोळीच सेवन केलं आहे. आता पुन्हा एक ही गोळी आणि गोळी बनवणारी कंपनी चर्चेत आली आहे. डॉक्टर ही गोळी का लिहून देत होते, याचे कारण आता समोर आले आहे.

हे वाचलं का?

या कारणांमुळे डॉक्टर Dolo 650 ही गोळी लिहून देत होते

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, वैद्यकीय प्रतिनिधींनी गुरुवारी सांगितले की या औषध निर्मात्याने रुग्णांना डोलो-650 औषध लिहून देण्यासाठी डॉक्टरांना 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची भेटवस्तू दिली होती. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वरिष्ठ वकील संजय पारीख यांनी सुनावणीदरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अहवालाचा संदर्भ दिला. डॉक्टर रुग्णांना चुकीचे डोस देत होते, असे या अहवालात म्हटलं आहे.

या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालय गंभीर

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी या कालावधीतील त्यांचा अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना कोविड-19 होता तेव्हा त्यांनाही डॉक्टरांनी डोलो-650 घेण्यास सांगितले होते. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठ म्हणाले, ‘हा गंभीर मुद्दा आहे. याकडे सामान्य खटला म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. आम्ही या प्रकरणाची नक्कीच सुनावणी करू. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 दिवसांनी होणार आहे.

डोलो कंपनीविरुद्ध जनहित याचिका

डोलो कंपनीच्या या कारवाईबाबत फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाने जनहित याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याचिकेत औषध निर्मिती आणि औषधांच्या किमतींवर नियंत्रण याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या जनहित याचिकेवर आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितले आहे. डॉक्टरांना विशिष्ट औषध लिहून दिल्याबद्दल मिळालेल्या भेटवस्तूंसाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

डोलोने कोरोनाच्या काळात विक्रीचा विक्रम केला

डोलो -650 ची किंमत फार जास्त नाही. सध्या 15 गोळ्या असलेल्या एका पाकिटाची किंमत सुमारे 31 रुपये आहे. यानंतरही Dolo-650 ने मायक्रो लॅब्सने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. खरं तर, कोरोना महामारीच्या काळात या औषधाच्या विक्रीत एवढी उडी होती की ते बाजारातून गायब झाले होते. 2020 मध्ये कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर डोलो-650 च्या 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्या. कंपनीने कोरोनाच्या काळात फक्त डोलो-650 ची 567 कोटी रुपयांना विक्री केली होती.

डोलो कंपनीने करोडोंचा आयकर चुकवला

आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये इतरही अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाच्या चौकशीत मायक्रो लॅबने 300 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे समोर आले आहे. यासोबतच कंपनीने आयकर कायद्याच्या कलम-194C चे उल्लंघन केले आहे. आयकर विभागाने छापेमारी दरम्यान 1.20 कोटी रुपयांची अज्ञात रोख आणि 1.40 कोटी रुपयांचे दागिनेही सापडले.

इतर अनेक औषधांमध्येही समस्या

या प्रकरणाबद्दल अधिवक्ता पारीख पुढे म्हणाले की, डोलो हे फक्त एक उदाहरण आहे, कारण ते अगदी अलीकडचे आहे. ते म्हणाले, “औषध किंमत प्राधिकरण 500 मिलीग्राम पॅरासिटामॉलच्या किंमती निश्चित करते. परंतु डोस 650 मिलीग्रामपर्यंत वाढवताच, ते नियंत्रित किंमत श्रेणीच्या बाहेर येते. हेच कारण आहे की 650 मिलीग्राम औषधांचा इतका प्रचार केला जातो. बाजारात अशी अनेक अँटीबायोटिक्स आहेत, ज्यांची गरज नसताना डॉक्टर रुग्णांना ती खाण्याचा सल्ला देतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर चौकटीची नितांत गरज आहे.

    follow whatsapp