भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- फडणवीस

मुंबई तक

• 08:47 AM • 22 Jun 2021

भाजपने शिवसेनेला एकत्र येण्यासाठी प्रस्ताव दिला आहे का? या प्रश्नाचं आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेला प्रस्ताव देण्याचा, एकत्र येण्याचा प्रश्नच, चर्चा घडण्याचा प्रश्नच येत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत […]

Mumbaitak
follow google news

भाजपने शिवसेनेला एकत्र येण्यासाठी प्रस्ताव दिला आहे का? या प्रश्नाचं आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेला प्रस्ताव देण्याचा, एकत्र येण्याचा प्रश्नच, चर्चा घडण्याचा प्रश्नच येत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत असंहीत असंही ते म्हणाले. प्रसारमाध्यमे विसरत असल्याने मी पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रकारची सरकारं फार काळ टिकत नाहीत. हे सरकार त्यांच्या बोजाने पडेल. शिवसेनेसोबत आमची कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आपल्या बोजाने हे सरकार पडेल तेव्हा आम्ही पर्याय देऊ. सरकार पाडण्यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न करत नाही. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी भाजपसोबत जुळवून घ्यावं असं म्हटलं होतं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेना संपवू पाहात आहेत असाही उल्लेख केला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आजच प्रताप सरनाईक यांना सामनातून उत्तर देण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता अशा प्रकारे काहीही घडलं नाही असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एवढंच नाही तर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन अवघं दोन दिवसांचं ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. या सरकारला स्वतःच्या स्वार्थापेक्षा महत्त्वाचं काहीही दिसत नाही. या सरकारला जनतेच्या प्रश्नाशी काहीही घेणंदेणं नाही त्यामुळे हे सरकार अधिवेशन टाळतं आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच गेल्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही आम्ही सरकारला जनतेच्या प्रश्नांवरून जेरीस आणू हे या सरकारला ठाऊक आहे त्यामुळेच हे सरकार अधिवेशन टाळतं आहे. कोरोनाचाही वापर राजकारणासाठी केला जातो आहे. अधिवेशन जवळ आलं की कोरोना वाढतो आणि ते टाळलं की कोरोना कमी होतो असं या सरकारचं धोरण आहे असाही आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    follow whatsapp