गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागांमध्ये सरकारने लॉकडाउन तर काही भागात संचारबंदीसह कठोर निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. या शंकेचं निरसन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर किती धोकादायक?
“मुंबईत सध्या लॉकडाउनची गरज नाहीये, रात्रीच्या संचारबंदीचीही सध्या गरज वाटत नाही. पण रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता शहरात काही निर्बंध नक्कीच लावले जाऊ शकतात. अनेक लोकं मुंबई नोकरी, उद्योगधंद्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाउन लावलं तर अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होईल. याच कारणासाठी महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याच्या विचारात नाहीये.” अस्लम शेख मालाड येथील एका हॉस्पीटलमध्ये लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अहमदनगरमधील भाजपचे माजी खासदार दिलीप गांधींचं कोरोनामुळे निधन
मालाड भागातील खासगी रुग्णालयात जाऊन अस्लम शेख यांनी ज्येष्ठ नागरिकांना लस योग्य पद्धतीने मिळत आहे की नाही याचा आढावा घेतला. याचसोबत शेख यांनी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन लस घ्यावी असं आवाहन केलं आहे.
Exclusive : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही – डॉ. रमण गंगाखेडकर
नवी दिल्ली: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. मात्र असं असून देखील कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, आयसोलेटेड केसेस आणि क्वॉरंटाइन कॉन्टॅक्ट हे खूपच मर्यादित आहे. असा अहवाल महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने सादर केल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना एक भलं मोठं पत्रच पाठवलं आहे.
कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्यातल्या काही भागांमध्ये अंशतः लॉकडाऊन, नवे निर्बंध लादण्यात आले, काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. मात्र या सगळ्या उपाय योजनांचा फारसा परिणाम झालेला नाही, असं म्हणत केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना रूग्णांच्या वाढीचा आलेख चढता आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सध्या दिसतं आहे.
कोरोना व्हायरसबाबत तुमच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं
ADVERTISEMENT