बदलापूर : डोळ्यात मिरचीपूड टाकून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

• 02:52 PM • 31 Jan 2022

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका ज्वेलर्सच्या दुकानात व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्याने ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पळवला आहे. बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली. चोरट्याने यावेळी पाच चेन आणि दोन ब्रेसलेट चोरून नेलं. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका ज्वेलर्सच्या दुकानात व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्याने ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पळवला आहे.

हे वाचलं का?

बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली. चोरट्याने यावेळी पाच चेन आणि दोन ब्रेसलेट चोरून नेलं. सखाराम चौधरी असं लुटण्यात आलेल्या व्यापाऱ्याचं नाव असून बदलापूर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी चोरटा चौधरी यांच्या दुकानात आला आणि त्याने सोन्याची चेन आणि ब्रेसलेट दाखवायला सांगितलं. त्यानुसार सखाराम चौधरी यांनी ८३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ५ चैन आणि दोन ब्रेसलेट काढून काउंटरवर ठेवले. त्यानंतर चोरट्याने सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगितल्यानं चौधरी हे अंगठी काढण्यासाठी पाठमोरे वळले असता चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि काउंटरवर दाखवण्यासाठी काढलेल्या ८३ ग्रॅम वजनाच्या ५ चेन आणि दोन ब्रेसलेट घेऊन तिथून पोबारा केला.

‘आता मोहाच्या वाईनलाही परवानगी द्या, म्हणजे लोकं चहाऐवजी तीच घेतील’, भाजप आमदाराचं CM ना पत्र

दुकानाबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून हा चोरटा पळून गेला. दरम्यान हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.

कल्याण : भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमावर मोक्काअंतर्गत कारवाई

    follow whatsapp