टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने पदकाची कमाई केली. यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरीही आश्वासक राहिली. परंतू एकीकडे भारतीय महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असताना त्यांच्या परिवाराला देशात जातीवरुन शिवीगाळ सहन करावी लागली. महिला संघाने अर्जेंटिनाविरुद्ध सामना गमावल्यानंतर वंदना कटारिया या खेळाडूच्या परिवाराला जातीवाचक शिवीगाळ सहन करावी लागली होती.
ADVERTISEMENT
संघात दलित खेळाडू जास्त असल्यामुळे भारताचा पराभव झाला अशी टीकाही वंदनाच्या परिवाराला सहन करावी लागली. अखेरीस हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणी अंकुरपाल, विजयपाल या दोन भावांसह सुमीत चौहान या तरुणाला अटक केली आहे.
BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी
वंदना कटारियाचा भाऊ चंद्रशेखर याने सिडकुल पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. अर्जेंटिनाविरुद्ध सामना हरल्यानंतर सुमीत, अंकुरपाल आणि विजयपाल यांनी वंदनाच्या घरासमोर फटाके फोडत आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी वंदनाच्या परिवाराला जातीवाचक शिवीगाळही केली. या घटनेनंतर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. संघात दलित खेळाडू असल्यामुळे भारताचा पराभव झाल्याचं आरोपींचं म्हणणं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT