अनेक शिवभक्त कानाकोपऱ्यातून रायगडावर येत असतात. या आणि मागच्यावर्षी अनेक शिवभक्तांना कोरोनामुळे रायगडावर येता आलं नाही. याचं निश्चित वाईट वाटतं असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. यावेळी संभाजीराजेंना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कायम ब्रांडेड कपडे आणि कपड्यांमध्ये पाहिलं जातं.. त्याबद्दल काय सांगाल? यावर क्षणाचाही विलंब न करता संभाजीराजे म्हणाले की छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळेच माझी ओळख आहे माझ्यासाठी शिवराय आणि शाहू महाराज यांच्या विचारांमुळे जी माझी ओळख आहे तोच माझ्यासाठी ब्रांड आहे. बाकी इतर कोणताही ब्रांड मी मानत नाही असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणासाठी मी उद्याही राजीनामा देण्यास तयार: खा. संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार आहे. दरवर्षी हा सोहळा थाटात साजरा होतो. मात्र यावेळी हा सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने हा सोहळा साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो आहे. यावर्षी आता संभाजीराजे छत्रपती हे रायगडावर पोहचले आहेत. ते आज तिथे मुक्काम करणार आहेत. मराठा आरक्षणामुळे संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच चर्चेत आहेत.
मराठा आरक्षण रद्द, जाणून घ्या खासदार संभाजीराजे यांची नेमकी प्रतिक्रिया
नारायण राणेंनाही सुनावले खडे बोल
शुक्रवारीच त्यांनी टीका करणाऱ्या नारायण राणेंनाही खडे बोल सुनावले होते. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीची मुदत संपायला आली आहे त्यामुळे ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र जनता त्यांच्या बाजूने आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला होता. ज्यानंतर संभाजीराजेंनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कुणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरीही हा इशारा आपल्याच पक्षातील लोकांना त्यांनी दिला आहे हे उघड आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या भेटींचा धडाका लावला आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या भेटी त्यांनी घेतल्या. आता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT