टिकटॉक स्टार समीर गायकवाडची पुण्यात आत्महत्या

मुंबई तक

• 02:13 PM • 22 Feb 2021

हजारो फॉलोवर्स असलेला पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी आत्महत्या केलीये. राहत्या घरी गळफास घेत समीरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीये. समीरच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. View this post on Instagram A post shared by ~????? ( भैय्या )???????~ ? (@samir_gaikwad1999_official) रविवारी संध्याकाळी पाच […]

Mumbaitak
follow google news

हजारो फॉलोवर्स असलेला पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी आत्महत्या केलीये. राहत्या घरी गळफास घेत समीरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीये. समीरच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. समीरचा भाऊ प्रफुल्लने या घटनेची माहिती लोणीकंद पोलीसांना दिली. समीरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांने त्याला तातडीने रुग्णालयामध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान समीरच्या खोलीत किंवा खिशात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसल्याची माहिती आहे.

कोण होता समीर गायकवाड?

समीर गायकवाड हा टिकटॉक या अॅपवर अतिशय लोकप्रिय होता. 22 वर्षीय समीरचे टिकटॉकवर अनेक चाहते होते. विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करुन तो टिकटॉकवर अपलोड करायचा. त्याचे व्हीडियो त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडायचे. याशिवाय समीर गायकवाडचं इन्स्टाग्रामवरही तुफान फॅन फॉलोईंग आहे.

समीर पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकत होता. म्युझिक तसंच शॉर्ट व्हिडीयो बनवणारा समीर तरूणांमध्ये फार फेमस होता. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी समीरने एक व्हिडीयो तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. सध्या समीरचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. समीर गायकडवाडच्या आत्महत्या प्रकरणात पोलीसांकडून चौकशी करण्यात येतेय. यावेळी समीरचा भाऊ आणि कुटुंबियांची चौकशी करण्यात येणार आहे. यानंतर समीरने आत्महत्येसारखं पाऊल का उचललं यासंबंधीची माहिती समोर येईल.

    follow whatsapp