पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उंच भरारी घेणाऱ्या टॉप 4 सुपर व्हुमन

मुंबई तक

• 12:22 AM • 07 Mar 2023

International Women Day 2023 : सुंदर-स्टायलिश आणि तिच्या कौशल्यांमध्ये तज्ञ, क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smruti mandhana) ही क्रिकेट जगतातील नवीन आशा आहे. मुख्य प्रवाहापासून नेहमीच दूर असलेल्या महिला क्रिकेटची ओळख स्मृतीने बदलून टाकली. त्याच वर्षी, टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये 409 खेळाडूंच्या लिलावात अव्वल ठरली. स्मृती मंधानाला (RCB) रॉयल चॅलेंजर्स […]

Mumbaitak
follow google news

International Women Day 2023 : सुंदर-स्टायलिश आणि तिच्या कौशल्यांमध्ये तज्ञ, क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smruti mandhana) ही क्रिकेट जगतातील नवीन आशा आहे. मुख्य प्रवाहापासून नेहमीच दूर असलेल्या महिला क्रिकेटची ओळख स्मृतीने बदलून टाकली. त्याच वर्षी, टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये 409 खेळाडूंच्या लिलावात अव्वल ठरली. स्मृती मंधानाला (RCB) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. WPL लिलावात ती सर्वात महागडी क्रिकेटर ठरली आहे. (Top 4 Super Women Who Dominate the Men’s Field)

हे वाचलं का?

26 वर्षीय स्मृतीच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की तिचे इंस्टाग्रामवर 7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या मोठ्या भावाला पाहून बॅट्समन स्मृतीने क्रिकेट स्वीकारले होते, पण आज ती एका मोठ्या मंचावर आहे. त्यांचा भाऊ श्रावण महाराष्ट्राकडून वयोगटातील क्रिकेट खेळला आहे, पण स्मृती ही आज देशाची ओळख आहे. स्मृती ऑक्टोबर 2013 मध्ये वनडेमध्ये द्विशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर महाराष्ट्राकडून खेळताना तिने पश्चिम विभागीय अंडर-19 स्पर्धेत गुजरातविरुद्ध 150 चेंडूत नाबाद 224 धावा केल्या.

महिला दिन विशेष: एसटी संपामुळे घरावर आर्थिक ताण, वाहन चालवून घरचा डोलारा सांभाळतेय रुपाली

सुमन मिश्रा: जेव्हा नऊ महिन्यांच्या मुलाच्या आईने महिंद्राची जबाबदारी घेतली

2015 मध्ये सुमन मिश्रा यांनी महिंद्रा समूहाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांच्याकडे नऊ महिन्यांच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारीही होती. हे सोपे नव्हते, परंतु त्यांच्या आवडीने त्यांना 2021 मध्ये स्ट्रॅटेजीचे प्रमुख बनवले. हा तो काळ होता जेव्हा ई-वाहनाचे युग आले होते. मग पुरुषप्रधान उद्योगातील काही महिलांपैकी एक असलेल्या सुमन मिश्रा यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली.

आज त्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीची सीईओ बनल्या आहेत. सुमनची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या संपूर्ण महिला वर्गाची बाजू घेण्यात चुकत नाही. बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत, सुमन म्हणतात, “हे जेंडरबद्दल नाही, तर एक संघटनात्मक संस्कृती विकसित करण्याबद्दल आहे. आज महिलांचा समावेश अधिक करणे हे माझ्यासाठी प्राधान्याचे आहे आणि एकदा आम्ही त्यांना नियुक्त केले की आम्ही त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.” असं त्या म्हणाल्या.

कंपनीला नवी दृष्टी देण्याचे श्रेय सुमन यांना जाते. जेव्हा त्यांनी महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीची जबाबदारी स्वीकारली, त्या वेळी पेट्रोल, सीएनजी, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री दर महिन्याला जेमतेम 1,000 युनिट्स होत होती. आज त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून दर महिन्याला 4,000 हून अधिक युनिट्सची विक्री होते. महिंद्राचा सध्या लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीमध्ये जवळपास 12.6 टक्के मार्केट शेअर आहे.

महिला दिन विशेष: ‘होम मिनिस्टर’ फिट तर कुटुंब सुपरहिट!

वयाच्या 50 व्या फाल्गुनी यांनी केली नवी सुरुवात

ज्या वयात लोक निवृत्तीचे नियोजन करू लागतात, त्या वयात फाल्गुनी नायर यांनी स्वप्ने जगली. कोणत्याही अनुभवाशिवाय वयाच्या 50 व्या वर्षी नायकाची ब्युटी स्टार्टअप सुरू करणाऱ्या फाल्गुनीने प्रत्यक्षात जे केले ते स्वप्नापेक्षा कमी नाही. फाल्गुनी केवळ महिलांनाच नाही तर मुलींनाही पुढे जाण्याची प्रेरणा देतात. 2012 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय 2022 पर्यंत 10 वर्षांत सौंदर्यविश्वात एक ओळख बनला होता.

19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबईत जन्मलेल्या फाल्गुनीने आपले करिअर इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून केले. एएफ फर्ग्युसन कंपनीत व्यवस्थापन सल्लागार म्हणून सुरुवात केली. 1993 मध्ये कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये सामील झाल्या आणि 19 वर्षे काम केले. त्यानंतर 2005 मध्ये त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक झाल्या आणि 2012 पर्यंत या पदावर होत्या. नोकरीच्या काळातच त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले आणि त्याचवेळी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. मग काय, नोकरी सोडण्याचा धोका पत्करून त्या व्यावसायिक म्हणून उदयास येऊ लागल्या.

लीना नायर : मुली झाल्याबद्दल आई-वडिलांना टोमणे मारायचे

लीना नायर, फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनेलच्या ग्लोबल सीईओ, पुरुष-प्रधान कॉर्पोरेट जगतात देखील उपस्थित आहेत. फॉर्च्युनने त्यांना 2021 च्या सर्वात शक्तिशाली भारतीय महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. एखाद्या जागतिक कंपनीत एचआर एक्झिक्युटिव्हला सीईओची जबाबदारी मिळाल्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.

लीनाचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांना एक बहीणही आहे. लीनाच्या आई-वडिलांना दोन मुली झाल्याबद्दल नेहमीच टोमणे मारले जायचे. मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत स्वत: लीना म्हणाल्या की, लोक विचारायचे की तू अधिक अभ्यास करून काय करशील? तुझ्या आई-वडिलांना फक्त दोन मुली आहेत, मुलगा नाही, हे ऐकून मला खूप राग यायचा, अस्वस्थ व्हायचे, पण या रागाला मी माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इंधन बनवलं.

XLRI जमशेदपूरची सुवर्णपदक विजेती लीना जवळपास 30 वर्षांपासून युनिलिव्हरशी संबंधित आहे. युनिलिव्हरची भारतीय उपकंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) सोबत 1992 मध्ये त्यांनी हा प्रवास सुरू केला. त्यांना 2013 मध्ये लंडनला बोलावण्यात आले आणि ग्रुपमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष (वरिष्ठ व्हीपी) ची जबाबदारी देण्यात आली. 2016 मध्ये पदोन्नती झाल्यापासून त्या युनिलिव्हरची CHRO आहे. आता त्यांच्या प्रोफाइलमध्ये चॅनेलच्या ग्लोबल सीईओचे शीर्षक जोडले गेले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गुडन्यूज; थेट T20 वर्ल्ड कपमध्ये एंट्री

    follow whatsapp