पुणे : बस चालकाला वाहतूक पोलिसाकडून आई-बहिणीवरून शिवीगाळ; शिवनेरी बसची काचही फोडली

मुंबई तक

• 04:45 AM • 08 Dec 2021

पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौकात बस चालक आणि वाहतूक पोलिसांत वाद झाला. या वादात वाहतूक पोलिसांनी बस चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच शिवनेरी बसची काचही फोडली. याप्रकरणी बसचालकाने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ही घटना बसमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमवारी (6 डिसेंबर) सायंकाळी […]

Mumbaitak
follow google news

पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौकात बस चालक आणि वाहतूक पोलिसांत वाद झाला. या वादात वाहतूक पोलिसांनी बस चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच शिवनेरी बसची काचही फोडली. याप्रकरणी बसचालकाने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ही घटना बसमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

सोमवारी (6 डिसेंबर) सायंकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान पुणे स्टेशन एसटी आगार येथून दादर-शिवनेरी बस बाहेर पडली. त्यानंतर मालधक्का चौकाकडे गाडी वळवून घेत असतानाच सिग्नलवरून पोलिसांनी बसचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिसांनी बसचालकाला आई-बहिणीवरून अर्वाच्य शिवीगाळही केली. त्यानंतर चालकाला खाली उतरण्यास सांगितलं. मात्र, चालक बस बाजूला घेत नसल्याचं बघून वाहतूक पोलिसाने शिवनेरी गाडीचा वायपर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थेट गाडीच्या काचेवर दगड मारला.

पुणे : बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर 19 वर्षाच्या तरुणाने केला बलात्कार; तळजाई टेकडीवरील घटना

काय झालं…?

मालधक्का चौकात शिवनेरी बस आल्यानंतर तिथे वाहतूक कोंडी झालेली होती. तासभरानंतरही वाहतूक कोंडी कायम राहिल्यानंतर चालकाने बस पुढे घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी बस चालकाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी एका पोलिसाने वर चढून बस चालकाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बस चालकाला खाली उतरण्यासही सांगितलं. मात्र, बस चालक खाली उतरत नसल्यानं मग थेट दगड फेकून मारला.

पुणे हादरलं! २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. दरम्यान चालक बाळकृष्ण फुलसुंदर यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तुकाराम फड यांनी सांगितले की, मालधक्का चौकात शिवनेरी बसच्या नुकसानीबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.

    follow whatsapp