UPI Charges : एप्रिलपासून ‘युपीआय’वरील व्यवहार महागणार, किती मोजावे लागणार पैसे?

मुंबई तक

29 Mar 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 11:48 PM)

UPI Transaction : दोन दिवसांनी म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच UPI व्यवहार देखील महाग होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट्सबाबत एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये 1 एप्रिलपासून UPI ​​द्वारे केलेल्या व्यापारी पेमेंटवर PPI शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. […]

Mumbaitak
follow google news

UPI Transaction : दोन दिवसांनी म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच UPI व्यवहार देखील महाग होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट्सबाबत एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये 1 एप्रिलपासून UPI ​​द्वारे केलेल्या व्यापारी पेमेंटवर PPI शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. (Transactions on ‘UPI’ will be expensive from April, how much money will have to be paid?)

हे वाचलं का?

RBI चंडिजिटल रुपी; कुठे मिळणार आणि त्याचा वापर कसा करायचा? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

इतके जास्तीचे शुल्क आकारले जाऊ शकते

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, मंगळवारी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, NPCI ने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI सादर करण्याची तयारी केली आहे. हे शुल्क 0.5-1.1 टक्के लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परिपत्रकात, UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची सूचना करण्यात आली आहे. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागेल.

सुमारे 70% व्यवहार रुपये 2000 पेक्षा जास्त आहेत

NPCI च्या परिपत्रकातून असे संकेत मिळतात की 1 एप्रिलपासून तुम्ही UPI पेमेंट म्हणजेच Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल माध्यमातून 2,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट तुम्ही केल्यास. यासाठी अधिक पैसे भरावे लागतील. अहवालानुसार, UPI P2M व्यवहारांपैकी सुमारे 70 टक्के व्यवहार 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहेत, अशा परिस्थितीत 0.5 ते 1.1 टक्के चार्ज लावण्याची तयारी आहे.

हद्दच झाली! सायबर चोराने आमदारांनाही सोडलं नाही, चार महिला आमदारांकडून उकळले पैसे

30 सप्टेंबरपूर्वी पुनरावलोकन केले जाईल

पीपीआयमध्ये, वॉलेट किंवा कार्डद्वारे व्यवहार होतो. इंटरचेंज फी सामान्यतः कार्ड पेमेंटशी संबंधित असते आणि व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी लागू केली जाते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की 1 एप्रिलपासून हा नवीन नियम लागू केल्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याचे पुनरावलोकन केले जाईल.

कोणाकडून शुल्क आकारले जाणार नाही

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे इंटरचेंज शुल्क सेट केले आहे. शेती आणि दूरसंचार क्षेत्रात सर्वात कमी इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. वास्तविक, इंटरचेन्ज शुल्क फक्त त्या वापरकर्त्यांना भरावे लागेल जे व्यापारी आहेत. या परिपत्रकानुसार, पीअर-टू-पीअर (पी2पी) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (पी2पीएम) मधील बँक खाते आणि पीपीआय वॉलेटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

    follow whatsapp