राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरुन सुरु असलेल्या संपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. सरकार कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आश्वासन देत असलं तरीही अनेक भागांमध्ये कर्मचारी संपावर ठाम आहेत. काही भागांमध्ये पोलीस बंदोबस्तात एसटी गाड्या सोडल्या जात आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक झाली.
ADVERTISEMENT
या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत विविध मार्गांवर चर्चा झाली असून मार्ग निश्चीत झाल्यानंतर त्याबद्दल जाहीर केलं जाईल असं अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
सध्या सुरु असलेल्या एसटी संपामुळे ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल होत आहेत. आज झालेल्या बैठकीत शरद पवारांसोबत चर्चा करण्यात आली, त्याला काही अधिकारीही उपस्थित होते. संपावर तोडगा काढण्यासाठी काय पर्याय असून शकतात यावर चर्चा झाली. एसटीची आताची आर्थिक स्थिती, एसटी फायद्यात येण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतही चर्चा केल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसेच कामगारांच्या संपाबाबत सकारात्मक तोडगा कसा काढता येईल याचाही विचार सुरु असल्याचं परब म्हणाले.
सोलापूर : आमच्या पगारात संजय राऊतांनी घर चालवून दाखवावं, संतप्त ST कर्मचाऱ्याचं आव्हान
कामगारांची वेतनवाढ, इतर राज्यांमध्ये एसटीची असणारी अवस्था, हायकोर्टात सरकार काय बाजू मांडणार असे विविध मुद्दे या बैठकीत चर्चेला आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नसला तरीही अनेक पर्यायांचा विचार या बैठकीत केला गेला आहे. दोन्ही बाजूंचं समाधान होऊन मध्यममार्ग काढला पाहिजे असा सूर आजच्या बैठकीत असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT