तृप्ती देसाईंचा शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पाठिंबा का?

मुंबई तक

17 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:56 AM)

Trupti desai supported ketaki chitale : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त कविता पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळही उडाली. महाराष्ट्रभरातून केतकी चितळेचा निषेध नोंदवण्यात आला. एवढंच काय तर केतकीला अटकही करण्यात आली. अशात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमात ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेला पाठिंबा दिला आहे. तृप्ती देसाई यांनी नेमका […]

Mumbaitak
follow google news

Trupti desai supported ketaki chitale : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त कविता पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळही उडाली. महाराष्ट्रभरातून केतकी चितळेचा निषेध नोंदवण्यात आला. एवढंच काय तर केतकीला अटकही करण्यात आली. अशात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमात ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेला पाठिंबा दिला आहे.

हे वाचलं का?

तृप्ती देसाई यांनी नेमका केतकीला पाठिंबा का दिला आहे?

केतकी चितळेने जी कविता पोस्ट केली आहे त्यामध्ये पवार असा उल्लेख होता. शरद पवार असं संपूर्ण नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे ते नेमकं शरद पवारांबद्दलचं बोलणं होतं हा विषय कदाचित न्यायालयात टिकणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणीवपूर्वक पवारांविषयी लिहिलं असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला ट्रोल करत आहेत आणि विरोध करत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?

काय आहे प्रकरण?

केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सतत वादात अडकणारी केतकी चितळे कोण?

केतकीने नेमकी काय पोस्ट केली आहे?

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

पोस्टची पार्श्वभूमी काय?

मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.

या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.

    follow whatsapp