20 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येमुळे टीव्ही जगतात खळबळ उडाली आहे. शुटिंगच्या सेटवरच तिने गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस तिच्या आत्महत्येचं कारण शोधण्यामध्ये लागले आहेत. तिच्या आईनं तिचा सह-कलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहमद खानला आत्महत्येला जबाबदार धरलं आहे. शीजान सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. दोघांचं 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्याने तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असं बोललं जात आहे. वालिव पोलीस सध्या शीजानची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
शीजान चौकशीदरम्यान रडू लागला
वालिव पोलीस ठाण्यात शीजानची चौकशी करणाऱ्या महिला अधिकारी यांनी आज तकशी खास बातचीत केली. त्यांनी सांगितले की, शीजान चौकशीदरम्यान रडू लागला. शीजान दोन दिवस तुनिषासोबतच्या ब्रेकअपबाबत वेगवेगळ्या कथा सांगत होता. मात्र वालिव पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी चौकशी सुरू केली असता, शीजान खान रडू लागला. महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पूर्वी शीजान गप्प बसायचा. कालपर्यंत त्याची देहबोली पाहून काहीही अंदाज लावणे कठीण होते. पण काल रात्री तो रडायला लागला, असं त्या म्हणाल्या.
शीजानला तुनिषाच्या अंतिमसंस्कारमध्ये जायचं आहे?
तुनिषाच्या पार्थिवावर मंगळवारी म्हणजेच 27 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे शीजानला अभिनेत्रीच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे का? त्याने व्यक्त केलेल्या काही इच्छा आहेत का? महिला अधिकाऱ्याने शीजानच्या बाजूने अशी कोणतीही इच्छा नाकारली आहे. त्या म्हणाल्या की, शीजानने अशी काहीही मागणी केली नाही. चौकशीदरम्यान तो फक्त रडत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तुनिषा प्रकरणाबाबत पोलीस सजग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची पोलिसांनी व्हिडीओग्राफी केली आहे. जेणेकरून प्रत्येक मिनिटाचा तपशील कॅमेराच्या नजरेत राहील. एवढेच नाही तर शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफीही करण्यात आली आहे. शीजानची चौकशी सुरू असतानाही तो त्याच्या कोणत्याही वक्तव्यावरून मागे हटू नये यासाठी व्हिडिओ स्टेटमेंट घेण्यात येत आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलीस रुग्णालयात गेले त्यावेळची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. कारण घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती रुग्णालयातूनच पोलिसांना मिळाली. त्यामुळे कोणत्याही वादापासून वाचण्यासाठी पोलीस प्रत्येक क्षणाची व्हिडीओग्राफी करत आहेत.
तुनिषासोबतच्या ब्रेकअपवर शीजान काय म्हणाला होता?
यापूर्वी पोलिसांच्या चौकशीत शीजान खानने तुनिषासोबत ब्रेकअप होण्याचे कारण दोघांच्या धर्म आणि वयात मोठा फरक असल्याचे सांगितले होते. शीजानच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि तुनिषाच्या वयात खूप फरक होता. दोघांचे धर्मही वेगळे होते. यामुळे त्याने तुनिषापासून फारकत घेतली. मात्र, पोलिसांनी शीजान खानचे म्हणणे गांभीर्याने घेतलेले नाही. पोलीस शीजान खानच्या प्रत्येक दाव्याची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT