ADVERTISEMENT
ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांची लाइफस्टाइल खूपच मस्त आहे.
पराग हे ट्विटरमध्ये आतापर्यंत चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणूनच काम करत होते. पण आता ते कॅलिफोर्नियामध्ये या कंपनीचा संपूर्ण कारभार सांभाळणार आहेत.
पराग यांनी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची जागा घेतली आहे.
ट्विटरचे सीईओ म्हणून निवड झाल्यानंतर पराग हे भारतीय वंशाच्या सिलिकॉन व्हॅली सीईओ लोकांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. ज्यामध्ये सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्यासारख्या लोकांचा समावेश आहे.
पराग यांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण वैगरे हे भारतातूनच झालं आहे. आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतल्यानंतर पराग हे आपल्या करिअरसाठी अमेरिकेतच सेटल झाले.
पराग यांनी आयआयटी-मुंबईमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. तसंच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कंम्प्युटर साइन्समध्ये देखील पीएचडी पूर्ण केली आहे.
यानंतर त्यांनी याहू आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनींमध्ये काम केलं होतं. 2011 साली त्यांनी ट्विटरमध्ये नोकरी स्वीकाराली होती.
पराग यांनी विनिता अग्रवाल यांच्याशी लग्न केलं आहे. त्या पेशाने एक फिजीशियन आहेत.
पराग आणि विनिताने ऑक्टोबर 2015 साली साखरपुडा केला होता. तर जानेवारी 2016 रोजी लग्नही केलं होतं.
विनिता स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये चिकित्सक आणि क्लिनिकल प्रोसेसर म्हणून काम करते.
या दाम्पताला छोटा मुलगा असून त्याचं नाव अंश अग्रवाल आहे.
परागचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, तो फिरण्यास खूपच इच्छुक आहे.
ADVERTISEMENT