Kangana: ‘पठाण’वरून कंगना-उर्फीमध्ये ट्विटर वॉर! PM मोदींचाही उल्लेख

मुंबई तक

• 12:28 PM • 30 Jan 2023

Uorfi Javed On Kangna Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परत आल्यापासून तिने पुन्हा एकदा तिच्या ट्विटच्या जोरावर बॉलिवूडवर (Bollywood) निशाणा साधला आहे. कंगनाने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने यावेळी केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदने (Uorfi Javed) थेट उत्तर दिलं आहे. ज्यामुळे दोघींमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावेळी उर्फीने कंगनाशी पंगा घेतला आहे. (Twitter […]

Mumbaitak
follow google news

Uorfi Javed On Kangna Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परत आल्यापासून तिने पुन्हा एकदा तिच्या ट्विटच्या जोरावर बॉलिवूडवर (Bollywood) निशाणा साधला आहे. कंगनाने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने यावेळी केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदने (Uorfi Javed) थेट उत्तर दिलं आहे. ज्यामुळे दोघींमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावेळी उर्फीने कंगनाशी पंगा घेतला आहे. (Twitter war between Kangana Ranaut and Urfi Javed over Pathan)

हे वाचलं का?

कंगना रनौतने एक ट्वीट करत लिहिलं की, ‘या देशाने फक्त सर्व खान सेलिब्रिटींनाच प्रेम दिलं आहे. लोक नेहमीच मुस्लिम अभिनेत्रींचे चाहते राहिले आहेत. म्हणूनच भारतावर द्वेष आणि समाजसत्तावादीविरोधीचा आरोप करणे अत्यंत चुकीचं आहे. जगात भारतासारखा देश नाही.’ कंगनाच्या या ट्विटनंतर उर्फी जावेद या वादात उडी घेतली आहे. उर्फी जावेदने रिट्विट करत कंगनाला सुनावलं आहे.

Santosh Kharat : आदित्य ठाकरेंची साथ सोडली, वरळीत शिवसेनेला (UBT) धक्का

‘माणसाची कला ही धर्माने विभागली जात नाही…’

उर्फीने रीट्विट करत लिहिलं, ‘अरे देवा! ही काय विभागणी आहे? मुस्लिम कलाकार, हिंदू कलाकार… धर्माच्या नावावर कलेची विभागणी कधीच होत नाही. इथे फक्त सर्व कलाकार आहेत.’

कंगना-उर्फीच्या ट्विट वॉरमध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख

उर्फीच्या या ट्विटनंतर कंगना गप्प बसेल असं होणार नाही. उर्फीच्या टिप्पणीला तिनेही पुन्हा उत्तर दिलं. ‘हो माझ्या प्रिय उर्फी, हे एक आदर्श जग असेल, परंतु जेव्हा ते शक्य नसते तेव्हा आपल्याकडे समान नागरी कायदा नाही. 2024 च्या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना समान नागरी संहिता मागूया. आपण करूया?’

Nashik: सत्यजित तांबे भाजपत करणार प्रवेश? भाजप नेत्याची घेतली भेट

ट्विटरवर कंगना-उर्फी आमने-सामने येण्याचं नेमकं कारण काय?

शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आठवडाभरापूर्वीच या चित्रपटाने देशात 300 कोटींचा आकडा पार केला आहे. असं असताना अलीकडेच चित्रपट निर्माती प्रिया गुप्ता यांनी चित्रपटगृहाच्या आतून एक व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडिओमध्ये ‘झूमे जो पठाण’ हे गाणं सुरू होतं आणि प्रेक्षक त्यावर नाचत होते.

यावर प्रिया गुप्ताने ट्वीट करत लिहिलं, “शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण तुम्हाला पठाणच्या यशाबद्दल अभिनंदन. पहिले, हे सिद्ध होते की हिंदू आणि मुस्लिम दोघेही शाहरूखवर समान प्रेम करतात, दुसरे म्हणजे, बॉयकॉट वादामुळे चित्रपटाचे नुकसान झाले नाही तर त्याला फायदा झाला आणि तिसरं म्हणजे, इरोटिका आणि चांगल्या म्युझिकने देखील काम केले. चौथं म्हणजे भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे.” यावर कंगना रनौतने प्रत्युत्तर दिलं होतं. आता यात उर्फीने उडी घेतली आहे.

    follow whatsapp