रेमडेसिवीर या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोन भावांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. 16 एप्रिलला अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक मोराळे यांना एक इसम बालेवाडी परीसरात कोरोना आजारावर उपचारांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 25000/- रु किंमतीस एक नग या प्रमाणे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राला Remdesivir विकाल तर कारवाई करू, मोदी सरकारची कंपन्यांना धमकी- नवाब मलिक
ही गोष्ट पोलिसांना कळली तेव्हा त्यांनी एक बनावाट ग्राहक तयार केला. प्रदीप देवदत्त लाटे (वय 25 ) हा 25 हजार रूपयांना एक इंजेक्शन विकतो आहे अशी माहिती मिळाली होती. प्रदीप लाटे हा मूळचा बालेवाडीतला आहे. मोटरसायकलवरून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन विकायला घेऊन आला. तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या रॅकेटमध्ये प्रदीपचा भाऊ संदीप लाटे याचाही सहभाग आहे असंही निष्पन्न झालं. संदीपला औषधांबाबत आणि वितरकांबाबत असलेल्या माहितीचा गैरवापर करून त्याने त्याच्या भावासह आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केला. संदीपच्या विरोधात जयश्री सवदती औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चतुश्रृंगी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती.
यापूर्वीही औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पुणे याच्या मदतीने गुन्हे शाखा पुणे शहर च्या वेगवेगळ्या पथकांनी सदर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या व्यक्तींविरुध्द 5 गुन्हे दखल करुन 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि 9 बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.
एकीकडे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. दुसरीकडे राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा भासतो आहे. अशात या इंजेक्शन्सचा काळा बाजार होतो आहे हेच दिसून येतं आहे. मुंबईतही काही दिवसांपूर्वी याच प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आता पुण्यातूनही अशीच घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT