Solapur : प्रेयसीच्या पतीला मारण्याचा कट रचला, पण दारूच्या नशेत दोघंही तलावात बुडाले...

तलाव खोल असल्यानं आणि दारू पिलेल्या अवस्थेत असल्यानं, दोघेही तलावातून बाहेर पडू शकले नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी रूपाली पाताडे यांची चौकशी केली, त्यावेळी कट उघडकीस आला.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Feb 2025 (अपडेटेड: 27 Feb 2025, 10:50 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला संपवण्याचा होता कट

point

प्रेयसीच्या पतीला दारू पिण्यासाठी बोलवून मारण्याचा प्लॅन

point

दारू प्यायलेले असल्यानं दोघेही तलावात पडले

सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी गेलेल्या प्रियकराचाच तलावात बुडून मृत्यू झाला. अवैध संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या प्रियकरानं मिळून कट रचला होता. मात्र, हा डाव प्रियकरावारच उलटला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Pune : स्वारगेटमध्ये घडलेल्या दुष्कृत्यातील आरोपीबद्दल मोठी माहिती समोर, जुन्या गुन्ह्यांची रेकॉर्डही काढले

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 18 फेब्रुवारी रोजी बार्शी तालुक्यातील महागावमध्ये घडली. तलावात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. गणेश अनिल सपट आणि शंकर उत्तम पताडे अशी मृतांची नावं आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा गणेश सपटचे शंकर पाताडे यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं, पण शंकर पाताडे या नात्यात अडथळा ठरत होते. यामुळे प्रियकर आणि प्रेयसीला मिळून महिलेचा पती शंकर पाताडे याला संपवण्याचा कट रचला.

18 फेब्रुवारीच्या रात्री गणेश सपटने शंकर पाताडे याला दारू पिण्याच्या आणि जेवणाच्या बहाण्यानं बाहेर बोलावलं. दोघेही एकत्र महागाव तलावावर पोहोचले. दारूच्या नशेत ते तलावाच्या पुलावर नाचू लागले. दरम्यान, गणेश सपटने शंकर पाताडे यांना तलावात ढकललं, पण तोल गेल्याने ते स्वतः तलावात पडले.

हे ही वाचा >>Amravati : 22 दिवसांच्या बाळाला लोखंडी सळईने 65 चटके, श्वास घेता येत नव्हता म्हणून अंद्धश्रद्धेतून विचित्र प्रकार

तलाव खोल असल्यानं आणि दारू पिलेल्या अवस्थेत असल्यानं, दोघेही तलावातून बाहेर पडू शकले नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी रूपाली पाताडे यांची चौकशी केली, त्यावेळी कट उघडकीस आला.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महिला आणि तिचा प्रियकर, मृत गणेश सपट याच्याविरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पांगरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतर कारवाई केली जात असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी सांगितले.

    follow whatsapp