देश सोडून पळालेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना ‘या’ देशात मिळाला आसरा

मुंबई तक

• 03:53 PM • 18 Aug 2021

तालिबानने देशावर सत्ता मिळवल्यानंतर काबूल सोडून बाहेर पळालेले अफगाणिस्तानचे पदच्युत राष्ट्रपती अशरफ घनी अखेरीस UAE मध्ये आश्रयसाठी गेले आहेत. बुधवारी संयुक्त अरब अमिराती सरकारने अशरफ घनी आणि त्यांच्या परिवाराला आम्ही मानवतेच्या आधारावर देशात राहण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं. युएई सरकारच्या अधिकृत WAM या वृत्तसंस्थेने याबद्दलची माहिती दिली आहे. युएईने अशरफ घनी यांना सध्या कुठे आसरा दिला […]

Mumbaitak
follow google news

तालिबानने देशावर सत्ता मिळवल्यानंतर काबूल सोडून बाहेर पळालेले अफगाणिस्तानचे पदच्युत राष्ट्रपती अशरफ घनी अखेरीस UAE मध्ये आश्रयसाठी गेले आहेत. बुधवारी संयुक्त अरब अमिराती सरकारने अशरफ घनी आणि त्यांच्या परिवाराला आम्ही मानवतेच्या आधारावर देशात राहण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं.

हे वाचलं का?

युएई सरकारच्या अधिकृत WAM या वृत्तसंस्थेने याबद्दलची माहिती दिली आहे. युएईने अशरफ घनी यांना सध्या कुठे आसरा दिला आहे याबद्दलच्या नेमक्या ठिकाणाची माहिती दिलेली नाहीये. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मिळलेल्या सत्तेनंतर घनी यांच्या जिवाला धोका असल्यामुळे युएई सरकारने ही काळजी घेतल्याचं कळतंय.

Afghanistan चा इतिहासच रक्तरंजित! कशी झाली सुरूवात? वाचा सविस्तर

रविवारी अशरफ घनी यांनी आपल्या परिवारासोबत काही पैसे व मोजक्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काबूल सोडलं होतं. काबूल सोडल्यानंतर अशरफ घनी यांनी फेसबूक पोस्ट लिहून रक्तपात थांबवण्यासाठी आपण देश सोडल्याची माहिती दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घनी सरकारवर आरोप करत तालिबानशी लढा न देता त्यांनी हार मानल्याचं म्हटलं आहे. घनी सरकार आपल्या देशाचं भवितव्य ठरवण्यात अपयशी ठरल्याचंही बायडन म्हणाले.

अशरफ घनी आणि त्यांच्यासोबतच्या काही अधिकाऱ्यांनी काबूल सोडल्यानंतर NATO चे सचिव जेन्स स्टोलनबर्ग यांनीही घनी सरकारवर टीका केली. तालिबानविरुद्ध लढाईत उभं राहण्यात अफगाण सरकार कमी पडल्याचं स्टोलनबर्ग म्हणाले. या प्रकरणात शांततामार्गाने तोडगा काढणं गरजेचं होतं परंतू यात घनी सरकार कमी पडल्याचीही टीका स्टोलनबर्ग यांनी केली. रशियन दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार काबूल सोडताना घनी यांनी हेलिकॉप्टर भरुन रोख रक्कम आणि आपल्या गाड्या घेऊन देश सोडल्याचं कळतंय.

काबूल सोडल्यानंतर घनी यांनी काळ ओमानमध्ये थांबल्यानंतर तजाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला. परंतू अफगाणिस्तानात तालिबानने मिळवलेल्या वर्चस्वानंतर तजाकिस्तान सरकारने घनी यांच्या विमानाला लँड करण्याची परवानगी दिली नाही. घनी यांच्या सोबत त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहीब देखील आहेत. दरम्यान घनी सरकारचे तत्कालिन उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी ट्विटरवर आपण तालिबानसमोर हार मानलेली नसून आपण आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

Afghanistan ची सत्ता काबीज करताच तालिबानींची आईसक्रीम पार्टी

    follow whatsapp