शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आले एकत्र!

मुंबई तक

23 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 06:55 AM)

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis: विधानभवनातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथम शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरचं उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस सोबत आले आणि चर्चा करत विधानभवनात गेले. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले. मात्र, राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis: विधानभवनातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथम शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरचं उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस सोबत आले आणि चर्चा करत विधानभवनात गेले.

हे वाचलं का?

2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले. मात्र, राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे टोकाला गेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र दिसणार का? याबद्दलही साशंकता व्यक्त केली जात होती. त्यातच आज दोन्ही नेते सोबत दिले आणि संवादही करताना दिसले.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अंतिम आठवड्यातील अधिवेशन सुरू असून, आज अनपेक्षित दृश्य बघायला मिळालं. सर्व आमदार विधानभवनात येत असताना अचानक उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आले. त्याच्यासोबत देवेंद्र फडणवीसही होते.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे विधानभवनाच्या प्रवेशद्वारापासून एकमेकांशी बोलत आले. दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला हे कळलं नाही, मात्र दोन्ही नेते हसत हसत बोलत होते. त्यानंतरही दोघेही एकत्रच विधानभवनात गेले.

ठाकरे फडणवीसांची जवळीक वाढतेय?

महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. याची सुरुवात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतरच सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर दोन्ही बाजूंनी होणारी टीका विखारी झाल्याचं दिसत होतं. पण काही दिवसांपूर्वी ठाकरे आणि फडणवीसांची जवळीक वाढल्याची चर्चा झाली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईन, असे देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपुर्वी म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानाचं संजय राऊतांनी स्वागतही केलं होतं. जानेवारी 2023 मध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी कारमधून आल्याचं पहायला मिळालं होतं.

लोकमत समुहाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कटुता नाही, माझे मन साफ आहे. आमच्या घरात असेच वातावरण आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. आदित्य ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतरच फडणवसांनी ठाकरे हे शत्रू नाही तर विरोधक आहेत असं विधान केलं होतं.

    follow whatsapp