Shiv Sena UBT : ‘नामर्दानगी, मौलाना मुलायम’, ठाकरेंचा मोदींवर हल्ला

मुंबई तक

• 04:12 AM • 30 Jan 2023

Hindu jan akrosh Morcha । Saamana Editorial News। Uddhav Thackeray : राज्यातील इतर शहरांपाठोपाठ मुंबईतही हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला. याच मोर्चावरून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं काही मुद्द्यांवर बोट मोदी-शाहांसह (Modi-Shah) भाजपची (Bjp) कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना देण्यात आलेल्या पद्म विभूषण नागरी पुरस्कारावरून हल्ला […]

Mumbaitak
follow google news

Hindu jan akrosh Morcha । Saamana Editorial News। Uddhav Thackeray : राज्यातील इतर शहरांपाठोपाठ मुंबईतही हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला. याच मोर्चावरून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं काही मुद्द्यांवर बोट मोदी-शाहांसह (Modi-Shah) भाजपची (Bjp) कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना देण्यात आलेल्या पद्म विभूषण नागरी पुरस्कारावरून हल्ला चढवला आहे. (Shiv Sena UBT Slams modi Government and Bjp)

हे वाचलं का?

ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलंय की, “पराभवाचे हादरे बसू लागले की, भाजप त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून, धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्द्यांवर भाजप व त्यांच्या मिंधे गटानं मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला.”

“अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचं सांगितलं गेलं, पण आघाडीवर भाजपचेच लोक होते. ‘आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,’ असं या मंडळींनी जाहीर केलं, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे”, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय.

Narendra Modi यांचं मिशन BMC : अवघ्या २० दिवसांत दुसरा मुंबई दौरा!

मोदी-शाहांचे रामराज्य; अग्रलेखात शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलंय?

“महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शाहांचं रामराज्यच चाललं आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचं त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवं. केंद्रात किंवा महाराष्ट्रात ‘मुस्लिम लीग’ किंवा ‘एमआयएम’सारख्यांचं राज्य असतं, तर ‘हिंदू आक्रोश मोर्चा’ला अर्थ होता”, असा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं मोदी-शाहांनाचं घेरलंय.

“लव्ह जिहाद व सक्तीच्या धर्मांतराचा असेल तर त्यावर कायद्यानं चर्चा व्हायलाच हवी. नव्हे, याबाबतीत कठोर कायदे व्हायला हवेत. याबाबत कुणाच्याच मनात शंका नाही, पण एखाद्या निवडणुकीचं बिगुल वाजलं की, भाजपशासित राज्यांत अचानक हिंदू ‘खतऱ्या’त येण्याची हालचाल सुरू होते. गुजरात, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांत हिंदुत्व ‘खतऱ्या’त येत असेल तर त्या राजवटीतच दोष आहेत”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) भाजप सरकारांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.

बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाला आमचा आजही आक्षेप -आशिष शेलार

मुलायम सिंह यादव… मोदी सरकारच्या निर्णयावर बोट

“हिंदू आक्रोशाचं एक प्रमुख कारण समोर आलं ते म्हणजे मौलाना मुलायमसिंह यांचा ‘हिंदू’ सरकारनं केलेला गौरव. प्रजासत्ताक दिनी मोदी सरकारनं मुलायम यांना पद्मविभूषणानं गौरवान्वित केलं. हा राम मंदिरासाठी बलिदान केलेल्या हजारो कारसेवकांचा अपमान आहे. कारण या हिंदू कारसेवकांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश मौलाना मुलायम यांचेच होते. त्यांचा राष्ट्रीय गौरव केल्यानंच हिंदू जन आक्रोश उसळला व शिवसेना भवनासमोर जमा झाला”, अशा शब्दात शिवसेनेनं (UBT) मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

Sharad Pawar: ‘C-Voterचा सर्व्हे खरं चित्र दाखवणारा,’ पवारांचंही मोठं भाकीत

‘शिवसेनेवर लव आणि सरकारविरुद्ध जिहाद’

अग्रलेखात असंही म्हटलंय की, “त्या सगळ्यांचे शिवसेनेवर ‘लव्ह’ आहे व दिल्लीच्या ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध ‘जिहाद’ आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरुद्धचा त्यांचा आक्रोशही महत्त्वाचा आहे. एक बरं झालं की, हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचं आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचं कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) भाजपला डिवचलं आहे.

    follow whatsapp