Jalana Maratha Protest : ‘मराठा आंदोलकांना हात लावलात तर…’, ठाकरेंचा सरकारला इशारा

प्रशांत गोमाणे

02 Sep 2023 (अपडेटेड: 02 Sep 2023, 05:16 PM)

अंतरावली सराटीगावात उद्धव ठाकरे उशिरा रात्री दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा आंदोलकांचे आझाद मैदानावरही आंदोलन झाले होते

mumbaitak

mumbaitak

follow google news

जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली सरावटीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात 350 हुन अधिक नागरीक आणि काही पोलीस गंभीर जखमी झाले होते. या लाठी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात आला. या सर्व घडामोडींवर आज शरद पवार, उदयनराजे भोसले, संभाजी राजे यांनी आज पहाटे आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर आता उशिरा रात्री उद्धव ठाकरे अंतरावली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी जर यापुढे आंदोलकांच्या केसाला धक्का लागला, तर अख्खा महाराष्ट्र येथे आणून बसवेल,असा इशाराच त्यांनी महायुती सरकारला दिला आहे.(udhhav thackeray meet jalana maratha protesters police stick attack on protesters)

हे वाचलं का?

अंतरावली सराटीगावात उद्धव ठाकरे उशिरा रात्री दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा आंदोलकांचे आझाद मैदानावरही आंदोलन झाले होते. त्यावेळी देखील हेच पोलिस होते. त्यावेळी आंदोलकांवर लाठ्या चालल्या नाहीत. तसेच आंदोलकांनी असा काय गुन्हा केला की त्यांच्यावर तुम्ही गोळ्या झाडल्यात. यापुढे जर येथील नागरीकांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे आणून बसवेल,असा इशाराचा ठाकरेंनी सरकारला दिला.

हे ही वाचा : Viral : अरे बापरे! प्राण्यांप्रमाणे चार पायावर चालतात ‘ही’ माणसे, काय आहे रहस्य?

दिल्ली सेवा विधेयकावर तुम्ही संसदेत बहुमताच्या जोरावर जसा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ फिरवलात, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच निर्णय घ्यावा. माझ्या मराठा, धनगर, ओबीसी समाजाला न्याय द्यावा, दिल्ली सेवा विधेयकाला आम्ही विरोध केला होता, आता बिनशर्त पाठिंवा देते,असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

मी टीव्हीवर बघितलं चौकशीचे सखोल आदेश दिले आहेत. सखोल म्हणजे किती खोल जाणार तुम्ही, आणि किती खोल गेल्यावर तुम्हाला तुमच्या निष्पणाचं पाणी लागणार, गोळ्या घालायचे आदेश कुणी दिले, लाठी मारायचे आदेश कुणी दिले? असे सवाल ठाकरेंनी उपस्थित केले. यासोबत मी टीव्हीवर एकलं वरून कोणाचा तरी फोन आला, कोणाचा आला होता. सखोल चौकशीत हा वरचा दिसणार आहे का? कारण तुम्ही खोल जाणार आहात वरचं कसं दिसणार तुम्हाला, सखोल चौकशीत वरचा फोन कुणाचा होता हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान मराठा आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन जखमी आदोलकांची भेट घेतली आहे.

    follow whatsapp