जशास तसे! भारतात येणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांना दहा दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचं

मुंबई तक

• 03:08 AM • 02 Oct 2021

लसीकरण झालेल्या भारतीयांना क्वारंटाईन सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून भारताने ब्रिटनला जशास तसे उत्तर दिलं आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनने पूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांसाठी 10 दिवसांच्या क्वारंटाईनची सक्ती करणारा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानंही तसाच निर्णय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी घेतला आहे. कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही भारतीय नागरिकांना ब्रिटनने दहा दिवसांच्या क्वारंटाईनसह आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करण्याचा निर्णय घेतला. […]

Mumbaitak
follow google news

लसीकरण झालेल्या भारतीयांना क्वारंटाईन सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून भारताने ब्रिटनला जशास तसे उत्तर दिलं आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनने पूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांसाठी 10 दिवसांच्या क्वारंटाईनची सक्ती करणारा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानंही तसाच निर्णय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी घेतला आहे.

हे वाचलं का?

कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही भारतीय नागरिकांना ब्रिटनने दहा दिवसांच्या क्वारंटाईनसह आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात हा निर्णय झाला. ब्रिटनने सुरुवातीला ‘कोविशिल्ड’ लशीला नकार दिला होता, नंतर मान्यता देऊनही येथून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर चाचणी आणि दहा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले होते.

ब्रिटनमध्येच विकसित झालेल्या लशीच्या वेगळ्या प्रकाराला नकार दिल्यानं मोठा पेच निर्माण झाला होता. भारताने यावर प्रतिक्रियात्मक कृती करण्याचा इशारा दिलाही ब्रिटनला दिला होता. त्यानुसार आता भारताने ब्रिटिश नागरिकांसाठी नियमावली लागू केली आहे.

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आता आरटीपीसीआर रिपोर्ट आणि दहा दिवसांचा क्वारंटाईन सक्तीचा करण्यात आला आहे. ब्रिटन सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या एका आठवड्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे.

प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी (कोविड चाचणी) केल्याचा रिपोर्ट ब्रिटिनच्या नागरिकांनी सादर करणं अनिवार्य असेल. तसेच विमानतळावर उतरल्यावर लगेच आणि आगमनानंतर आठ दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी करणंही बंधनकारक करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

ब्रिटनने परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर कोरोना नियम लागू केले. ब्रिटनचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. भारत आणि ब्रिटनमध्येही कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरूनही वाद उद्भवला होता. त्यानंतर भारताने कठो भूमिका घेतली.

असे असतील नियम…

भारताने घेतलेल्या निर्णयाची ४ ऑक्टोबरपासून अमलबजावणी केली जाणार आहे.

४ ऑक्टोबरपासून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची असेल.

विमानतळावर उतरल्यानंतर आणि आगमनानंतर आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक.

भारतात आल्यानंतर संपूर्ण लसीकरण झालेलं असो वा नसो दहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार.

    follow whatsapp