नारायण राणे यांच्या गाडीवर ड्यूटी असलेल्या चालकाचा मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

मुंबई तक

• 07:39 AM • 06 Sep 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गाडीचालकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. मात्र मयत चालकाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. मेडिकल रजेवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अशोक कुमार वर्मा असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. अशोक कुमार वर्मा हे उत्तर प्रदेशातील […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गाडीचालकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. मात्र मयत चालकाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. मेडिकल रजेवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

हे वाचलं का?

अशोक कुमार वर्मा असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. अशोक कुमार वर्मा हे उत्तर प्रदेशातील राज्य स्थावर विभागात चालक म्हणून कार्यरत होते. नारायण राणे लखनौच्या दौऱ्यावर असताना अशोक कुमार यांची नारायण राणे यांच्या गाडीवर ड्यूटी लावण्यात आली होती.

ड्यूटीवर असताना अशोक कुमार यांना ह्रदयविकासाचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचपर्यंत त्यांच्या मृत्यू झाला. अशोक कुमार वर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

‘अशोक कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय रजा घेतलेली होती. पण, केंद्रीय मंत्री (नारायण राणे) दौऱ्यावर आल्यानंतर वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांना बळजबरीने ड्यूटीवर बोलावून घेण्यात आलं’, असा आरोप कुटुंबीय व नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबीयांनी स्थावर विभागाचे प्रमुख अमरिश श्रीवास्तव यांच्यावर आरोप केले आहेत. ‘अशोक कुमार वर्मा यांच्या आजाराविषयी श्रीवास्तव यांना माहिती होती. मात्र, तरीही त्यांनी फोन करून बोलावून घेतलं. फोनवर त्यांनी निलंबित करण्याची धमकी दिली. ज्यामुळे अशोक कुमार वर्मा यांना ड्यूटीवर जावं लागलं’, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी हजरतगंजचे सहाय्यक पोलीस आयुक्त राघवेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली. अशोक कुमार वर्मा यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला आहे. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केलेला आहे व तशी तक्रारही दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचं नेमकं कारण समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल’, असं मिश्र म्हणाले.

राघवेंद्र मिश्र पुढे बोलताना म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लखनौमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर अशोक कुमार यांची ड्यूटी लावण्यात आली होती’, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान अशोक कुमार यांची पत्नी माध्यमांशी बोलताना मंत्री सुरेश राणा यांचं नाव घेत आहे. अशोक कुमार वर्मा हे लखनौतील पेपर मिल कॉलनीत आपल्या चार मुली व पत्नीसह राहत होते.

    follow whatsapp