जहिराबाद : स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही? असा सवाल करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन जिल्हाधिकारी जितेश पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तसेच स्वस्त धान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात राज्याचा वाटा किती रुपये असतो अन् केंद्राचा वाटा किती रुपये असतो? या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यानेही त्यांनी पाटील यांना झापले.
ADVERTISEMENT
निर्मला सीतारामन मागील दोन दिवसांपासून तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्या भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा प्रवास योजना’ या योजनेंतर्गत जहिराबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या होत्या. या दौऱ्यात काही सरकारी योजनांचाही आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी त्या बिकरुर या ठिकाणी पोहचल्या. जिल्हाधिकारी जितेश पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते.
राज्यपालांनी घेतली CM शिंदेंच्या पत्राची दखल : ‘मविआ’ची 12 आमदारांची यादी अखेर रद्द
निर्मला सीतारामन यांना एका स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही. त्यावरुन त्यांनी जिल्हाधिकारी पाटील यांना काही प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, गरिबांना त्यांच्या राज्यात स्वस्त दरात 1 किलो तांदुळ उपलब्ध करुन देण्यात केंद्र सरकारचा सिंहाचा वाटा असतो. त्याच दर्जाचा तांदुळ खुल्या बाजारात 35 रुपये किलो दराने मिळतो. यात राज्य सरकराचा वाटा किती असतो? असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकारी जितेश पाटील यांना विचारला.
पाटील यांना या प्रश्नाचे उत्तर न आल्याने सीतारामन चांगल्याच भडकल्या. त्यांनी पाटील यांना माहिती सांगण्यासही सुरुवात केली. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार प्रति किलो तांदळासाठी 30 रुपये खर्च करते. यात राज्य सरकार केवळ 1 रुपया देते. मार्च-एप्रिल 2020 मध्ये तर केंद्र सरकारने 30 ते 35 रुपयांचा तांदुळ राज्याकडून एक रुपयाही न घेता पुरवला होता. मग तरीही तेलंगणातल्या सरकारी रेशन दुकानांमध्ये मोदींचे फोटो का नाही?
‘दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा…’; श्रीकांत शिंदेंचं अजित पवारांच्या वर्मावर बोट
या संदर्भात सीतारामन यांच्या कार्यालयाने एक ट्विटही केले. यात पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना या अंतर्गत 5 किलो पर्यंतचे धान्य पूर्णपणे मोफत दिले जाते. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या धान्याची 80 टक्के रक्कम केंद्र सरकार भरते. मग स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावण्यावर काही आक्षेप आहे का?
या सर्व प्रकारानंतर निर्मला सीतारामन यांनी जिल्हाधिकारी जितेश पाटील यांना आपले लोक येवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावतील. मात्र जिल्हाधिकारी म्हणून हा फोटो हटविला जाणार नाही, किंवा झाकून ठेवला जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसेच मी परत इथे येवून प्रत्यक्ष खातरजमा करणार असल्याचा इशाराही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
ADVERTISEMENT