गडकरी youtube वरुन महिन्याला चार लाख कसे कमावतात?; काय करावं लागतं?

मुंबई तक

• 01:20 AM • 21 Sep 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे गडकरी अनेकदा चर्चेतही असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी चर्चेत आहेत, ते यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना होत असलेल्या कमाईबद्दल… यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गडकरींना महिन्याला चार लाख रुपये मिळतात. मागील आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी यूट्यूबच्या माध्यमातून मिळतात असलेल्या पैशांबद्दल सांगितलं. नितीन गडकरी यांच्या नावे […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे गडकरी अनेकदा चर्चेतही असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी चर्चेत आहेत, ते यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना होत असलेल्या कमाईबद्दल… यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गडकरींना महिन्याला चार लाख रुपये मिळतात.

हे वाचलं का?

मागील आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी यूट्यूबच्या माध्यमातून मिळतात असलेल्या पैशांबद्दल सांगितलं. नितीन गडकरी यांच्या नावे यूट्यूबवर एक चॅनेल आहे. या चॅनेलचे जवळपास दोन लाख २७ हजारांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.

नितीन गडकरी यांचा प्रसिद्धी विभाग ज्याला इंग्रजीमध्ये पीआर टीम असं म्हटलं जातं. तर पीआर टीमकडून गडकरी यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले जातात. यात नितीन गडकरी यांच्या भाषणांचे आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे केलेल्या संवादाचे व्हिडीओ असतात.

गडकरी यांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला व्हिडीओ चार धाम महामार्ग प्रकल्पाचा आहे. चार वर्षांपूर्वी हा व्हिडीओ अपलोड केलेला आहे. या व्हिडीओला १.२ मिलियनपेक्षा अधिक व्यूज मिळालेले आहेत.

‘यूट्यूब’वरून पैसे कमावण्यासाठी काय करायचं?

यूट्यब अनेकांच्या कमाईचं साधन बनलं आहे. अनेकजण वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडीओ अपलोड करून पैसे कमावतात. यात अनेकांच्या कमाईचा मोठा आहे. त्यामुळे अलिकडे अनेकजण यूट्यूब चॅनेलकडे वळू लागले आहेत.

यूट्यूबला उत्पन्नाचं साधन बनवण्यासाठी स्वतः यूट्यूब चॅनेल असणं आवश्यक आहे. तुम्ही जीमेल अकाऊंटच्या माध्यमातून यूट्यूबवर चॅनेल बनवू शकता. चॅनेल बनवल्यानंतर त्या चॅनेलवर व्हिडओ अपलोड करायला सुरूवात करायची. (व्हिडीओ वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकतात. जसे अनेकजण विविध पदार्थ कसे बनवाये वा पर्यटन स्थळाची माहिती देणारे असे व्हिडीओ करतात.)

पैसे कधी मिळतात?

यूट्यूब चॅनेल कमाईचं चांगलं माध्यमं असलं तरी त्यासाठी सातत्य आणि संयम या गोष्टीची गरज असतेच. यूट्यूबवरून पैसे मिळवण्यासाठी बराच काळ काम करत रहावं लागतं. व्हिडीओ अपलोड करावे लागतात. यूट्यूब चॅनेलसाठी आखून दिलेली मॉनिटायझेशन पॉलिसी पाळावी लागते.

तुमच्या चॅनेलचे कमीत कमी १००० सबस्क्राईबर असायला हवेत. त्याचबरोबर १२ महिन्यांच्या कालावधीत ४००० हजार तास वॉच टाईम व्हायला हवा. त्याचबरोबर अॅडसेंसशी लिंक केलेलं अकाऊंट असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब कम्युनिटीच्या मार्गदर्शक तत्वांचं ज्याला इंग्रजी गाईडलाईन्स म्हटलं जातं, त्याचं तंतोतं पालन करावं लागतं.

गुगल अॅडसेंस काय असतं?

तुम्ही अपलोड करत असलेल्या व्हिडीओला पैसे देण्याचं काम गुगल अॅडसेंस करते. अॅडसेसं तुमच्या चॅनेलवर अपलोड होणारा कंटेट आणि ते बघण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या आधारावर जाहिराती आणण्याचं काम करते. उत्पादनाची जाहिरात करणारे जाहिरात देतात आणि त्यासाठी पैसेही देतात.

    follow whatsapp