निम्म्या किमतीत सोनं खरेदी करण्याचा मोह पंढरपुरातील एका युवकाला चांगलाच महागात पडला आहे. आरोपींनी सोनं खरेदीसाठी आलेल्या चौघा मित्रांच्या गळ्याला कोयता आणि धारदार शस्त्र लावून अंगावरील सोनं आणि खिशातले पैसे काढून घेतल्याचा प्रकार पंढरपूर मधील करकंब या गावात घडला आहे.
ADVERTISEMENT
अनिकेत पोरे, राजशेखर कोरे, रोहित खुने आणि पांडुरंग पोरे अशी गंडा घालण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गणेश महाराजा नावाच्या व्यक्तीची या चौघांशी ओळख झाली. यावेळी गणेश महाराजने दोन नंबरचं सोनं निम्म्या किमतीत मिळतंय तुम्ही घेणार का असं या चारही तरुणांना विचारलं. या चारही तरुणांनी सोनं खरेदीची तयारी दाखवल्यानंतर गणेश महाराजांनी एक मोबाईल नंबर देत त्यांना या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितलं.
८० हजार डॉलर्सच्या डिजीटल दरोड्यातील आरोपींना पकडण्यात सातारा पोलिसांना यश
यानंतर अनिकेत पोरे या तरुणाने गणेश महाराजांनी दिलेल्या नंबरवर फोन केला असता समोरील एका महिलेने आपल्याकडे दोन नंबरचं सोनं निम्म्या किमतीत तयार असल्याचं सांगितलं. सोनं खरेदीसाठी तिने चौघांना करकंब – टेंभुर्णी रोडवरील व्यवहारे पाटीच्या पुढे विहिरीजवळ बोलावलं.
पिंपरी-चिंचवड : पिस्तुल दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
त्यानंतर अनिकेत पोरे, पांडुरंग पोरे, राजशेखर कोरे , रोहित खुने हे चौघे पंढरपूरवरून दोन मोटारसायकलीवरून करकंबला गेले असता त्या ठिकाणी आरोपींनी त्यांना पहिल्यांदा सोनं दाखवलं. यानंतर पिशवीतून कोयता आणि धारदार शस्त्र काढून या चारही तरुणांच्या अंगावर असलेलं सोनं आणि रोख रक्कम असा मुद्देमाल काढून घटनास्थळावरुन पोबारा केला. या प्रकाराची करकंब गावात चर्चा सुरु असून पोलिसांनी चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT