शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरु असलेल्या आंदोलनाची धग वाढतच चालली आहे. हातकणंगले येथील वीज कार्यालयात आज एका अज्ञात व्यक्तीने साप सोडल्याचं समोर आलं. परंतू यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या सापाला पकडून बाहेर सोडून दिलं.
ADVERTISEMENT
सध्या शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्या अंधारात शेतात काम करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी अनेकदा शेतकरी आपला जीवही धोक्यात घालतो. त्यामुळे शेतीला दिवसा दहा तास वीजपुरवठा व्हावा याकरता राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या १० दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अशाच पद्धतीने साप सोडण्यात आला होता. यानंतर सांगलीत महावितरणचं कार्यालय पेटवून देण्यात आलं होतं. यानंतर आज हातकणंगले येथे साप सोडून महावितरणच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या वीजेसाठी राजु शेट्टींचं आंदोलन, सांगलीत महावितरणचं कार्यालय पेटवलं
दरम्यान शेतीला सकाळी दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील या भागांमध्ये स्वाभिमानी करणार चक्का जाम आंदोलन –
चंदगड / गडहिंग्लज व आजरा तालुका –
1. पाटणे फाटा.
2. अडकूर
3. शिनोळी
4. नेसरी
5. भडगांव
6. गडहिंग्लज मार्केट यार्ड.
7. कडगांव
8. झुलपेवाडी फाटा.
9. आजरा.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच सोडला साप, कोणी केलं भयंकर कृत्य?
कागल तालुका –
1. कागल
2. सिध्दनेर्ली.
3. कापशी.
4. मुरगूड.
हातकंणगले तालुका –
१. हुपरी
२. हातकंणगले
३. कबनूर.
४. वठार.
राधानगरी तालुका –
१. राधानगरी
२. आमजाई व्हरावडे.
३. मुदाळतिट्टा.
४. म्हासुर्ली.
करवीर तालुका –
1. सांगरूळ फाटा.
2. भोगावती.
3. आंबेवाडी.
4. सांगवडे फाटा.
पन्हाळा तालुका –
१. कोतोली फाटा.
२. बोरपाडळे फाटा.
शाहूवाडी तालुका –
१. बांबवडे
२. मलकापूर.
शिरोळ तालुका –
१. चौंडेश्वरी चौक.
२. अंकली टोल नाका.
३. कुरूंदवाड.
४. शिरदवाड.
५. गणेशवाडी.
जागतिक वन्यजीव दिन : डोंबिवली-बदलापुरात अवतरली सापांची दुनिया
दरम्यान स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्या बारावीच्या परीक्षेसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करुन सकाळी ११ वाजल्यानंतर चक्काचाम आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बारावीच्या पेपरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्याही सूचना राजू शेट्टींनी दिल्या आहेत.
ADVERTISEMENT