नवी दिल्ली: कोरोना संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज (7 जून) पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सायंकाळी पाच वाजता बोलणार आहेत. अशी माहिती PMO ने दिली आहे. आता या संबोधनाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागून राहिले आहेत. (address to the nation)
ADVERTISEMENT
आजपासून देशातील अनेक भागात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी अभिभाषणातून कोणती नवी घोषणा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अनलॉकबाबत (Unlock) सावधानतेचा इशारा देणार पंतप्रधान मोदी?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) प्रभाव आता कमी झाला आहे आणि बऱ्याच राज्य सरकारांनी लॉकडाऊन हळूहळू उठविण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
अशा परिस्थितीत पीएम मोदी आपल्या भाषणात अनलॉक करण्याच्या या प्रक्रियेवर संवाद साधू शकतात आणि लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. यापूर्वी जेव्हा-जेव्हा अनलॉक करण्यात आलं आहे तेव्हा-तेव्हा बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली होती.
Lockdown ची घोषणा, 20 लाख कोटींचं पॅकेज; दीड वर्षात नरेंद्र मोदींनी किती वेळा देशाला केलं संबोधित?
देशव्यापी मोफत लस मोहीम सुरू होईल?
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींसह सर्व विरोधी नेत्यांनी देशव्यापी मोफत लस मोहीम सुरू करावी, अशी मागणी सातत्याने केली आहे. सध्या केंद्र सरकारतर्फे 45 वर्षाच्या अधिक वयोगटाच्या लोकांना मोफत लस दिली जात आहे. तर 18 वर्षावरील नागरिकांसाठी राज्य सरकारांनी स्वतः लस खरेदी करावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने देशभर लसीकरण मोहीम राबविली पाहिजे. तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीसरण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशावेळी मोफत लसीबाबत पंतप्रधान मोदी काही घोषणा करू शकतात का? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
आणखी एका आर्थिक पॅकेजची घोषणा होणार?
कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व काही ठप्प आहे. मग ते मोठ्या कंपन्या असोत किंवा रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते. कोरोना व्हायरसचा प्रत्येकाच्या कामावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थादेखील कोलमडली आहे.
आता केंद्राकडून या दिशेने काही मोठी पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती. त्याअंतर्गत अनेक उद्योगांना सूट देण्यात आली होती.
तथापि, विरोधकांकडून सतत मागणी आहे की सर्व कामगार आणि सामान्य लोकांच्या खात्यात केंद्राकडून थेट आर्थिक मदत दिली जावी. जेणेकरुन लोक त्यांचा खर्च भागवू शकतील.
Prime Minister नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार
पंतप्रधान मोदी कोणती नवी घोषणा करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना काय बोलतील हे आधीच सांगणे कठीण आहे. परंतु सध्या कोरोनाच्या संकटाविषयी ज्या प्रकारे चिंता वाढत आहे. त्याबद्दल पंतप्रधानांच्या अभिभाषणातून आशा निर्माण झाल्या आहेत.
मुख्य मुद्द्यांखेरीज पंतप्रधान मोदी लसीकरणाबद्दल देशभर पसरलेला गोंधळाबाबत बोलण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यावेळी पंतप्रधान मोदी हे एखादी नवी घोषणा करण्याचीही शक्यता आहे. कारण आतापर्यंत अनेकदा पंतप्रधान मोदींनी तसं केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं.
देशातील कोरोनाची परिस्थितीः
-
एकूण रुग्ण: 2,89,09,975
-
अॅक्टिव्ह रुग्ण: 14,01,609
-
एकूण मृत्यू: 3,49,186
-
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण: 2,71,59,180
-
आतापर्यंत किती लसींचे डोस देण्यात आलेले आहेत: 23,27,86,482
ADVERTISEMENT