UP BJP: भाजपची पहिली यादी जाहीर, पाहा योगी आदित्यनाथ कुठून लढणार

मुंबई तक

• 09:01 AM • 15 Jan 2022

UP Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 107 उमेदवार जाहीर केले आहेत. या सगळ्यात भाजपने मात्र एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हो अयोध्यातून निवडणूक लढतील. पण जेव्हा यादी जाहीर झाली तेव्हा त्यात असं […]

Mumbaitak
follow google news

UP Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 107 उमेदवार जाहीर केले आहेत. या सगळ्यात भाजपने मात्र एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हो अयोध्यातून निवडणूक लढतील. पण जेव्हा यादी जाहीर झाली तेव्हा त्यात असं समोर आलं की, योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढतील.

हे वाचलं का?

भाजपने 107 उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी 83 विद्यमान आमदार होते. याच 83 आमदारांपैकी 63 आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर 20 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

कोण कुठून लढणार?

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने नोएडाचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना तिकीट दिले आहे. तर नंदकिशोर गुर्जर यांना लोणीतून तिकीट देण्यात आले आहे. गौतम बुद्ध नगरच्या तीनही जागांवर भाजपकडून केवळ विद्यमान आमदारालाच तिकीट मिळाले आहे.

नोएडा विधानसभेचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरी विधानसभेतून तेजपाल नगरला भाजपचा उमेदवार बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेवर विधानसभेचे विद्यमान आमदार धीरेंद्र सिंह यांना तिकीट मिळाले आहे.

अखिलेश यादवांची योगींवर टीका

भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी यांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, ‘मला वाटते की त्यांना घरीच राहावे लागेल. घरी गेल्याबद्दल त्यांचे खूप-खूप अभिनंदन. योगी यांना निवडणुकीच्या आधीच घरी पाठविण्यात आलं आहे.’

‘ज्या मुख्यमंत्र्यांना गोरखपूरमध्ये मेट्रो चालवता आली नाही, जे सीवर लाइन टाकू शकले नाहीत, ज्यांनी वीज महाग केली. त्यांच्याकडून जनता काय अपेक्षा करणार?’

अखिलेश यादव पुढे असंही म्हणाले की, ‘समाजवादी पक्ष गोरखपूरमधील सर्व जागा जिंकेल. यूपीची 80 टक्के जनता आमच्यासोबत आहे. यावेळी जनतेने सरकार बदलण्याचा निर्धार केला आहे. समाजवादी पुरोगामी राजकारण करत आहे.’

उत्तर प्रदेशात स्वतः प्रचाराला जाणार, समाजवादीसोबत निवडणूक लढवणार-शरद पवार

अखिलेश यादव यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘लोकांनी दोन स्टूल असलेले उपमुख्यमंत्र्यांना पाहिले आहेत. केशवप्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. आता भाजप किंवा अन्य पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा समाजवादी पक्षात समावेश केला जाणार नाही. असंही अखिलेश यावेळी म्हणाले. अनेक विधानसभेच्या जागांचा त्याग करून आमचा पक्ष इतर पक्षांमध्ये युतीत सामावून घेत आहे. आम्ही खूप त्याग केला आहे.

अखिलेश म्हणाले की, ‘भाजप आधीच हिट विकेट, रन आऊट झाली आहे. पॅव्हेलियनबाहेर गेली आहे. लवकरच समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. 2012 च्या जाहीरनाम्याप्रमाणे शिक्षण, आरोग्य, सामाजिक योजना आदींची दखल घेतली जाईल, यासाठी प्रयत्न केले जातील.’ असं म्हणत त्यांनी यावेळी उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होईल असा दावा केला आहे.

    follow whatsapp