Upcoming Smartphones December 2024 : रेडमी, ओप्पो ते वन प्लस... फोन घेणाऱ्यांसाठी ऑप्शन वाढले, हे स्मार्टफोन होणार लॉन्च

मुंबई तक

30 Nov 2024 (अपडेटेड: 30 Nov 2024, 04:04 PM)

2025 या नव्या वर्षाची सुरूवात होण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक आहे, त्यामुळे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या कंपन्या आपले खास मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.

Mumbaitak
follow google news

New Mobiles : नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या कंपन्या आपले खास मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. हे स्मार्टफोन भारतीय बाजारात हीट ठरण्याची शक्यता आहे. कमी किंमतीत चांगले फिचर्स देण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न असल्यानं ग्राहकांना त्याचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

iQOO 13

iQOO 13 हा फोन पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉन्चसंदर्भातील सर्व माहिती शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असला, तरी भारतात तो येत्या 3 डिसेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनी iQOO 12 च्यानंतर पुढचं व्हर्जन अनेक   नव्या फिचर्ससह बाजारात आणणार असल्यानं ग्राहत आतुरतेनं वाट पाहायत. या मोबाईलमध्ये तुम्हाला Snapdragon 8 Elite प्रोसेसर, स्टायलिश ॲल्युमिनियम फ्रेम, ग्लासी पॅनल, IP69 रेटिंग आणि इतर दमदार फीचर्स मिळतील. स्मार्टफोनचा मागील पॅनल RGB LED लाइट्मुळे आकर्षक दिसतो.

हे ही वाचा 30th November Gold Rate: सोनं घ्या सोनं! 24 तासातच सोन्याच्या भावात मोठी घसरण, मुंबईत आजचे भाव काय?

Redmi Note 14

Redmi Note 14 सिरीजही देखील लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. Redmi कंपनी 9 डिसेंबर रोजी ही सिरीज भारतात लॉन्च करेल, ज्यामध्ये  Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+ हे तीन वेगवेगळे स्मार्टफोन असणार आहे. या मोबाईलमध्ये 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारी सिस्टिम असणार आहे.

MediaTek Dimensity 7300-Ultra प्रोसेसरही Redmi Note 14 Pro मध्ये उपलब्ध असेल. तर Note 14 आणि Note 14 Pro+ मध्ये MediaTek Dimensity 7025-Ultra आणि Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असतील.

Vivo X200

याशिवाय डिसेंबर महिन्यातच Vivo कडून Vivo X200 सिरीजही लॉन्च करण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी Vivo X200 आणि Vivo X200 Pro हे दोन मोबाईल लाँच करणार आहे. विशेष म्हणजे 200MP टेलिफोटो कॅमेरा लेन्स या मोबाइलचं आकर्षण असणार आहे. कंपनीने लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही, मात्र डिसेंबरमध्येच हे मोबाईल लॉन्च केले जाऊ शकतात.

 

हे ही वाचा >> Cyclone Fengal: नव्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका? 100 किमी वेगानं धडकणार!

 

OnePlus 13

OnePlus 13 हा मोबाइलही कंपनी डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होऊ शकतो. हा मोबाईल चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 6.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तसंच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, 6000mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग सपोर्ट असणार आहे.

    follow whatsapp