उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं होतं. चित्रा वाघांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय. उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आयोगाला सवाल करणाऱ्या चित्रा वाघांवर चाकणकरांनी गांधारी म्हणत पलटवार केलाय.
ADVERTISEMENT
उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणीही केलीये. त्यामुळे उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
आता या वादात चित्रा वाघांनी महिला आयोगाला सवाल केले. त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी महिला नेत्या समोरा-समोर आल्यात.
उर्फीच्या कपड्यांचा वाद पेटला! रुपाली चाकणकर चित्रा वाघांच्या ‘रडार’वर
उर्फी जावेद : रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघांना काय दिलंय उत्तर?
पुण्यात माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाकडं आत्तापर्यंत 10,907 तक्रारी आल्या पैकी 9,520 तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. त्यामुळे आयोगानं काय करावं हे कुणी सांगायची गरज नाही.”
चाकणकर पुढे असं म्हणाल्या की, “तुम्ही ज्या व्यक्तीबाबत मला विचारात आहात, त्यांना महिलांवर अन्याय झालं की वेदना होतात. मंगेश मोहिते, राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख यांनी महिलांवर केलेल्या अन्यायाकडेही त्या लक्ष घालतील आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्या पीडित महिलांना न्याय मिळवून देतील”, असा टोला चाकणकरांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
‘संजय आठवतोय का?’, उर्फी जावेदनं ठेवलं चित्रा वाघ यांच्या वर्मावर बोट
“ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे, बलात्काराचे आरोप आहेत असे खासदार राहुल शेवाळे एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात, तेव्हा ताई (चित्रा वाघ) या काय गांधारीच रुपात असतात का? असा प्रश्न पडतो”, असा उपरोधिक सवालही रुपाली चाकणकरांनी वाघांना केलाय.
महिला आयोगाकडून उर्फी जावेदचं समर्थन, रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
एकीकडे चित्रा वाघ उर्फी जावेदवर टीका करत असताना महिला आयोगानं उर्फीची बाजू घेतलीये. “कुणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही”, अशी भूमिका आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Urfi Javed: चित्रा वाघांची कोंडी करणारी उर्फी जावेद आहे तरी कोण?
“प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कुणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं”, अशा शब्दात रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केलाय.
ADVERTISEMENT