आधीच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली असून, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून, आज राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली असून, त्यांनी परीक्षांबद्दलची शिक्षण खात्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्री म्हणाल्या,’विद्यार्थी दुहेरी लढाई लढत आहेत. विद्यार्थ्यांवर खूप दडपण आणि तणाव आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि विद्ययार्थ्यांची सुरक्षितता, हे मुद्दे सरकारच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. परीक्षेचा निर्णय हा तज्ञ मंडळींशी चर्चा करूनच घेतलेला आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
परीक्षेच्या निर्णयावर पुर्नविचार करण्याबद्दल शिक्षणमंत्री म्हणाल्या की, ‘आंदोलनकर्त्यांचे प्रमुख चर्चेला तयार आहेत. उद्या बोलावून चर्चा करू. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हीच भावना आहे’, असंही त्या म्हणाल्या.
‘मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. तज्ञ व्यक्तींशी चर्चा करतो आहोत. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नाही अशाच पद्धतीनं दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल. मुलांनी अभ्यास करावा शासन म्हणून योग्य निर्णय घेईल. तीस लाख विद्यार्थी वर्गाची परीक्षा असल्याने काळजीने निर्णय घ्यावा लागेल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यभर विद्यार्थ्यांचं आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव, ‘हिंदुस्थानी भाऊ’ पोलिसांच्या ताब्यात
‘भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल. डोंगराळ भाग, दुर्गम भाग अशा विविध पद्धतीने अभ्यास करावा लागेल. दहावी-बारावीच्या परीक्षा एकाच वेळी घाव्या लागतील. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी वर्गाने आता अभ्यास करावा. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊन नये म्हणून चर्चा प्रश्न करू आणि चर्चेतून प्रश्न सोडवू. निवेदन देवून उद्देश सफल झाला पाहिजे. चर्चा करूनच प्रश्न सुटला पाहिजे. उद्या चर्चा करून निर्णय घेवू’, असं वर्षा गायकवाड दहावी-बारावीच्या परीक्षांबद्दल बोलताना म्हणाल्या.
ADVERTISEMENT