वसई: मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. अशातच वसईमध्ये एक थरारक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसईमध्ये पावसाच्या पाण्यातून मोटरसायकलने जात असताना सकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान वसई फाटा ते भोइदापाडा या रस्त्यावरील चिंचपाडा परिसरात अचानक पाण्याचा वेग वाढला आणि मोटरसायकल सोबत 35 वर्षीय आनंदकुमार सिंह त्यात वाहून गेला.
ADVERTISEMENT
परंतु नशीब बलवत्तर म्हणूनच तो या जीवघेण्या प्रसंगातून बचावला. जेव्हा आनंदकुमार हा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागला तेव्हा त्याच्या हाताला नाल्याजवळ एका झाडाची फांदी लागली. ती संधी साधून त्याने सुरुवातीला फांदी घट्टपणे पकडून ठेवली आणि नंतर तो त्या झाडावर चढून बसला.
दरम्यान, यावेळी समोर काही लोकं हा संपूर्ण प्रकार पाहत होते. पण पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्यांना तरुणाची सुटका करता येत नव्हती. त्यामुळे तेथील एका तरुणाने पोलिसाला फोन लावून याबाबतची संपूर्ण हकीकत सांगितली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाळीव पोलिस ठाण्यात तैनात पोलीस उप-निरीक्षक लक्ष्मण बोरा यांनी आपले सहकारी जाधव यांना घेऊन घटनास्थळी पोहचणयाचा प्रयत्न केला पण पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यांनी एका ट्रक चालकाला घेऊन आणि कमरेभर पाण्यात ट्रक घेऊन शिरले. यावेळी इतर तरुण देखील पण पोलिसांच्या मदतीला धावून आले.
यानंतर लक्ष्मण बोरा यांनी ट्रकमधील प्लाय आणि ट्रकवरील दोरी आनंदकडे फेकली आणि त्याला ट्रककडे आणण्यासाठी प्रयत्न केला. तब्बल 2 तास झाडावर बसलेला आनंद घाबरून गेला होता म्हणून तो पुढे येण्यास तयार नव्हता. परंतु पोलिसांनी त्याची समझूत घातली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले.
चार दिवस मुसळधार पावसाचे, कोकण गोव्यासाठी IMD ने दिला Orange Alert
जेव्हा पाण्याचा प्रवाह कमी झाला तेव्हा आनंदची मोटरसायकल दगड़ात अडकलेली आढळली. वाळीव पोलीस ठण्याचे अधिकारी बोरा यांनी जे धाडस दाखवून आनंद याला मृत्यूच्या तावडीतून बाहेर सुखरूप काढल्याने त्यांची व त्यांच्या सहकारी तसेच स्थानिक तरुणांची स्तुती केली जात आहे.
ADVERTISEMENT