कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. बॉलिवूडच्या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. नुकतंच जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रणधीर कपूर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यामुळे रणधीर कपूर यांना रणधीर कपूर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील काही तपासण्यांसाठी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रणधीर कपूर यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, मला कोकिलाबेन रूग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. माझ्या काही अधिक चाचण्या करायच्या आहेत. मी टीना अंबानी यांचे आभार मानू इच्छितो. आता सर्व काही नियंत्रणात आहे. माझी याठिकाणी चांगली काळजी घेतली जातेय. पूर्ण वेळ माझ्या आजूबाजूला डॉक्टर्स असतात.
ते पुढे म्हणाले, “मला काही प्रमाणात थंडी जाणवत होती. यानंतर मी माझी कोव्हिडची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.” रणधीर यांना ताप आला होता. मात्र आता त्यांना ताप नसून त्यांची प्रकृती चांगली आहे.
ADVERTISEMENT