बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांच्या सांगण्यानुसार, त्यांना रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल केलं आहे.
ADVERTISEMENT
सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या चाहत्यांनी चिंता करु नये. त्यांची तब्येत स्थिर आहे. लवकरच ते घरी परततील. त्यांचं वय आणि सध्याची परिस्थिती पाहता त्यांना रूटीन चेकअपसाठी दाखल केलं आहे.
दिलीप कुमार 98 वर्षांचे आहेत. सध्या देशात सर्वत्र कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. या संकटकाळात दिलीप कुमार यांनी आपला वाढदिवस देखील साजरा केला नाही. तर गेल्या वर्षी कोरोनामुळे दिलीप कुमार यांनी आपल्या भावाला देखील गमावलं होतं.
ADVERTISEMENT