शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंच्या अपघाताच्या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विचारले असता ही क्लिप मी आत्ताच ऐकली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझा देखील बोलणं झालं आहे. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ज्योती मेटे फोन क्लिपबाबत काय म्हणाल्या आहेत?
३ ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी मला सांगितलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.
विनायक मेटेंचा अपघातासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आहे. त्या म्हणाल्या की व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझंही बोलणं झालं आहे. त्यांचं म्हणणं होतं की समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी अशा पद्धतीने गाडी ओव्हरटेक करत होती. ही बाब निश्चित आक्षेपार्ह होती. त्यामुळे एकूण प्रकारची झाली पाहिजे अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.
आमदार विनायक मेटे यांच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (यशवंतराव चव्हाण महामार्ग) गाडीचा रविवारी (१४ ऑगस्ट) पहाटे अपघाती मृत्यू झाला. विनायक मेटेंसह गाडीत तिघे होते. यात गाडी चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र त्यांचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. या अपघातात विनायक मेटे जागीच गतप्राण झाले.
विनायक मेटे अपघात : रायगड, पालघर पोलिसांनी ट्रक चालकाला कसं शोधलं?
विनायक मेटे अपघात प्रकरणांमध्ये त्यांच्या गाडीचा ज्या ट्रकमुळे अपघात झाला होता, तो ट्रक दमणमध्ये असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. नंतर रायगड पोलिसांनी पालघर पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला. या ट्रकचा मालक पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचं समोर आलं. त्यानुसार पालघर पोलिसांनी ट्रक मालकाला विश्वासात घेऊन अपघातासंबंधी माहिती दिली. ट्रक तसेच ट्रक चालकाची माहिती देण्याची मालकाला विनंती केली.
ADVERTISEMENT