सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक जण छोट्या-छोट्या प्रसंगांमधून आपले सेलिब्रेशन सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. मुंबईच्या कांदिवली भागात एका पठ्ठ्याने आपल्या वाढदिवशी धुरळाच केला आहे. एक दोन नव्हे तर चक्क ५५० केक कापत या व्यक्तीने आपला वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ सूर्या रतुडी या व्यक्तीने हे ५५० केक कापले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमीत्त मित्र परिवार आणि पाठीराख्यांनी हे ५५० केक आणले होते. सूर्या रतुडी हा व्यक्ती नेमका कोण आहे, त्याच्या वाढदिवसानिमीत्त एवढ्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन कसं करण्यात आलं याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. परंतू या आगळ्यावेगळ्या बर्थ-डे सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT