ADVERTISEMENT
लॅपटॉप मेकर्स हे विद्यार्थ्यांसाठी अधिक परवडणारे लॅपटॉपही बाजारात लाँच करत आहेत. सध्या कोरोनामुळे अभ्यास देखील ऑनलाइन केला जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला 20,000 रुपयांच्या आत लॅपटॉप घ्यायचा असेल तर आम्ही त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देणार आहोत. हे पाच लॅपटॉप 20,000 रुपयात तुम्हाला खरेदी करता येणार आहे.
Asus Chromebook C423NA BV0523
Asus Chromebook C423NA BV0523 लॅपटॉपची किंमत 19,999 रुपये आहे. यात 14-इंच HD Anti-Glare स्क्रीन 200 nits पीक ब्राइटनेस असणार आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल कोर Intel Celeron प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.
Avita Cosmos 2 in 1 NS12T5IN025P
Avita Cosmos 2 in 1 NS12T5IN025P याची किंमत 17,990 रुपये आहे. जो आपल्याला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. यात 11.6-इंच full HD IPS LCD टच डिस्प्ले आहे. यात ड्युअल Intel Celeron प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी 6 तासांपर्यंत चालू शकते.
RDP ThinBook 1010
RDP ThinBook 1010 हा लॅपटॉप अॅमेझॉनवर 19,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 14.1 इंचीचा HD डिस्प्ले आहे. यात क्वाड कोरIntel Celeron N3450 प्रोसेसर आहे. यात 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेज असणार आहे. कंपनीचा दावा आहे की यात 8 तासांपर्यंत बॅटरी लाइफ आहे. हे Windows 10 Pro ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.
Asus E203 E203MAH-FD005T
Asus E203 E203MAH-FD005T हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर 19,529 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 11.6 इंचीचा HD डिस्प्ले आहे. यामध्ये Intel Celeron N4000 प्रोसेसर असणार आहे. यात 4GB रॅमसह 500GB हार्ड ड्राइव्ह आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी लाइफ 4 तासांपर्यंत आहे.
Avita Essential NE14A2INC433 MB
Avita Essential NE14A2INC433 MB लॅपटॉप अॅमेझॉनवरून 18,990 रुपयांना खरेदी करता येईल. हा लॅपटॉप Intel Celeron N4000 प्रोसेसरवर चालतो. यात 14 इंचीचा full HD TFT IPS आहे. यात 4GB रॅमसह 128GB SSD स्टोरेज आहे. कंपनीचा दावा आहे की या लॅपटॉपची बॅटरी एकाच चार्जवर 6 तास टिकते.
ADVERTISEMENT