सुरेन्द्र रामटेके, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या तक्रारीवरुन वर्धा पोलिसांनी नामांकित कदम हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर रेखा कदम यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेमुळे वर्ध्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासह या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आली असून अन्य दोन आरोपीसह एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सोबत सूत जुळले होते. मुलगा साडे सतरा वर्षाचा, तर मुलगी तेरा वर्षांची आहे. या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने मुलीला गर्भधारणा झाली.
यासंबंधात पीडित मुलीच्या आईवडिलांनी अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मुलीची बदनामी होईल असे धमकावून तिचा गर्भपात करून घेण्याचा अट्टाहास केला. त्यानंतर डॉक्टरला तीस हजार रुपयात देऊन मुलीचा गर्भपात करुन घेण्यात आला. असे तक्रारीत म्हटलं आहे.
याबाबत शनिवारी (9 जानेवारी) रात्री आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावरून पोलिसांनी रात्रीच नियमांतर्गंत तात्काळ पावलं उचलून योग्य ती कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरु केल्या.
कोल्हापूर: 61 वर्षीय वासनांध सावकाराकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पीडितेने दिला स्त्री अर्भकाला जन्म
मात्र, महिला डॉक्टरचं घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर या दोन्ही ठिकाणी पाळत ठेवावी लागली. अखेर रविवारी (10 जानेवारी) सकाळी महिला डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुले आणि त्यांच्या पथकाने अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले
या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत व बेकायदेशीर गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आदी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पॉस्को सेलच्या उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी या घटनेचा तपास करीत आहे.
नात्याला काळीमा! बापाचे अल्पवयीन मुलीसोबत शारिरिक संबंध, गरोदर राहिल्यानंतर दिलं लग्न लावून
नेमकी घटना काय?
पोलीस तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपीने साधारण 5 ते 7 महिन्यांपूर्वी 13 वर्षीय मुलगी घराच्या मागील बाजूस शौचास गेलेली असताना तिच्यावर वारंवार जबरी संभोग केल्याने ती गर्भवती राहिली. एक दिवस पीडित मुलीचं पोट दुखू लागल्याने तिला तिच्या पालकांनी एका खासगी रुग्णालयात नेलं. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचं समजलं. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी आरोपी अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना माहिती दिली.
याप्रकरणी आपण पोलीस तक्रार करणार असल्याचे पीडितेच्या पालकांनी सांगताच आरोपीच्या आई-वडिलांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं. हे प्रकरण दाबून टाकावं, यासाठी आम्ही पैसे देण्यास तयार आहोत. तसं न केल्यास तुमची बदनामी करु अशी धमकीही दिली. त्यामुळे त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली नाही.
यानंतर 3 जानेवारी रोजी आरोपीच्या पालकांनी मुलीच्या आई-वडिलांना धमकावून मुलीला डॉ. रेखा कदम यांच्या खासगी दवाखान्यात नेलं आणि तिच्या गर्भपात केला. यासाठी त्यांनी रेखा कदम यांना 30 हजार रुपये देखील दिले. असं फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT