मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील काही शहरात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसा इशारा देण्यात आला असून, कोकणातील दोन जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, हे क्षेत्र तीव्र होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टा पश्चिम, दक्षिण पश्चिम दिशेला शक्यता वर्तवण्यात आली असून, याचा परिणाम राज्यात दिसून येणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील ३ ते ४ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (अतिवृष्टी सदृश्य) पाऊस होण्याची अंदाज आहे. तसा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
आज (१२ सप्टेंब) राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली असून, मुंबई, ठाण्यासह या सातही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
कोकणातील पावसाचा जोर वाढणार असून, पुणे, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
१३ सप्टेंबर -मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार?
सोमवारी (१३ सप्टेंबर) पावसाचा जोर आणखी वाढणार असून, मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट कायम…
मंगळवारीही (१४ सप्टेंबर) पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT