ADVERTISEMENT
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात वीकएन्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत गजबजलेले रस्ते आज असे रिकामे दिसत आहेत
जीवनावश्यक वस्तू वगळता सगळीच दुकानं बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे
मुंबईतल्या सगळ्याच गजबजलेल्या रस्त्यांवर हा असा शुकशुकाट पाहण्यास मिळतो आहे ज्यामुळे लोकांना गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचीही आठवण झाली आहे
मुंबईतला नरीमन पॉईंट परीसर असा शांत आणि निवांत आहे
समुद्र किनाऱ्यावरही मुळीच गर्दी नाही, अत्यावश्यक गरज नसल्यास बाहेर पडूच नका असं आवाहन करण्यात आलं आहे ज्याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातही रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाहीये..
ADVERTISEMENT