आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. आर्यन खानच्या अपहरणाचा मास्टरमाईंड मोहित कंबोज होता. मोहित कंबोज आणि समीर वानखेडे हे पार्टनर आहेत. समीर वानखेडे ड्रग्ज पेडलर्सना अभय देतात, ट्रॅप लावून हायप्रोफाईल लोकांना अडकवतात आणि खंडणी वसूल करतात असा आऱोप मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडेंनी शाहरुख खानला धमकावलं आहे असाही आरोप मलिक यांनी केला. आज काय काय आरोप करण्यात आले जाणून घ्या.
ADVERTISEMENT
1) कोर्टाच्या कारवाईत एक गोष्ट वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडेची मदत त्याने वारंवार घेतली आहे.
2) 7 ऑक्टोबरला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही. समीर वानखेडेने आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खानलाही आरोपी करू म्हणून धमकावलं आहे.
3) मोहित कंबोजने 1200 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. मोहित कंबोज पूर्वी काँग्रेसमध्ये आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्यामागे फिरत असायचा. त्यानंतर सरकार बदललं आणि तो भाजपमध्ये गेला. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्यात आले.
4) 18 कोटींमध्ये सेटलमेंट झाली होती हे आता प्रभाकर साईलमुळे समोर आलं आहे. प्रभाकरने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला आहे. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसूझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत.
5) माझ्यावर आरोप करण्यात येतो आहे की मी प्रभाकर साईलला पढवून पोलीस ठाण्यात पाठवलं. परंतू तुमच्या माहितीसाठी सांगतो 22 तारखेला मनोज संसारे यांचा मला फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार आहेत. मी याबाबत मुख्यमंत्र्यांनादेखील यांना सांगितलं. मुख्यमंत्री यांनी डी जी पांडे यांना सांगितलं. त्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यानंतर पालघरची टीम मुंबईत येऊन थांबली होती. संसारे यांना फोन केला तर ते बोलले त्यांचा फोन बंद लागतो. त्यानंतर मात्र मी परत डीजींना फोन केला नाही. त्यानंतर दुपारी माझ्याकडे दुपारच्या सुमारास मनोज संसारे आणि प्रभाकर सैल आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. त्यांनतर मी मुंबईत आलो, असं मलिक म्हणाले.
6) सुनील पाटील नावाच्या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटील हा भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो कोणत्या पार्टीचा व्यक्ती आहे हे मी बोलत नाही, असं मलिक म्हणाले. सुनील पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत. 6 तारखेला पाहिल्यांदा मला सुनील पाटीलचा फोन आला. तो येतो बोलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील फोन आला मात्र तो आला नाही. तो आज येणार होता परंतु आज अखेर तो आलेला नाही, असंही मलिक म्हणाले.
7) एक केस झाली होती. व्हीट बॅकरी केस मध्ये सचिन टोपे आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सॅम डिसूजाला 23 जूनला एक नोटीस देण्यात आली होती. एनसीबीच्या वतीने हजर होण्यासाठी मात्र तो आजपर्यंत तो हजर झालेला नाही. 23 जून पासून आज अखेर त्याची अटक का झाली नाही? 5 महिने याला अटक झाली नाही आणि आता तो समीर वानखेडे यांना क्लिनचिट देत आहे. हा दोन व्यक्तींसोबत काम करतो एक राजीव बजाज आणि दुसरा आहे प्रदीप नाम्बियार. हे दोघे पत्रकार आहेत. हे दोघे वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचे भाग आहेत.
8) मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढत आहे. ड्रग्जच्या नावावर जी हजारो कोटी रुपयांची जी वसुली होत आहे त्यांच्या विरोधात मी लढत आहे.
9) मी एनसीबीच्या डीजी साहेबांना विचारणार आहे की त्यांनी एक स्टेटमेंट 2 तारखेला दिल होत की पहिल्यांदा समुद्रात कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो कारवाई समुद्रात झाली नाही. अगोदरच कारवाई केली होती. ज्या केस मध्ये चार्जशीट झाली आहे त्या केसची चौकशी हे काय करणार आहेत. एक तर त्यांना सत्य समोर आणायचं आहे नाही तर त्यांना मला घाबरवायचं आहे. मी त्यांना सांगतो मी घाबरणारा नाही.
10) माझ्या जावयाने म्हटलं आहे की जर हे अशाप्रकारे चुकीच्या कारवाया करत असतील तर ही लढाई अशीच सुरू ठेवा. जर मला 20 वर्षे तुरुंगात राहावं लागलं तरी हरकत नाही, मात्र यांना सोडू नका.
ADVERTISEMENT