राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर किती धोकादायक?

मुंबई तक

• 04:06 PM • 16 Mar 2021

हर्षदा परब: राज्यात कोरोना रुग्णांची फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने वाढते आहे. राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 813 अक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य विभागाच्या डोकेदुखीचा भाग झालीय. पण असं असलं तरी यातली दिलाश्याची बाब म्हणजे याचा कमी असलेला मृत्यूदर. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सर्व्हेलन्स विभागातील अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई तकशी […]

Mumbaitak
follow google news

हर्षदा परब: राज्यात कोरोना रुग्णांची फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने वाढते आहे. राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 813 अक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य विभागाच्या डोकेदुखीचा भाग झालीय. पण असं असलं तरी यातली दिलाश्याची बाब म्हणजे याचा कमी असलेला मृत्यूदर.

हे वाचलं का?

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सर्व्हेलन्स विभागातील अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई तकशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात दिसणारा कोरोना हा 2020 च्या कोरोनाच्या तुलनेत सौम्य आहेत. ज्यामुळे रुग्णांची संख्या मोठी असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्या कमी असल्याचं दिसयं.

राज्यातील मृत्यूदर जानेवारी महिन्यात 1.66 टक्के एवढा होता. मागच्या दीड महिन्यात तो 1 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याची माहिती डॉ. आवटे यांनी मुंबई तका दिली आहे. तर, मार्च महिन्यात .55 टक्के वर आल्याचं त्यांनी सांगितलं. मार्च 2021मध्ये राज्यातील कोरोनामुळे होणारा सरासरी मृत्यूदर 2.26 आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरात ऑक्टोबर महिन्यापासून घट होत असल्याची माहिती डॉ. आवटे यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्याचा मृत्यूदर हा 2.49 टक्के एवढा होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्याचा मृत्यूदर 2.52 टक्के होता.

राज्यातील कोरोना रुग्णाचं बरं होण्याचं प्रमाण 91.77 टक्के आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 95.26 टक्के होता.

कोरोनाच्या व्हायरसचं म्युटेशन झाल्यामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने होत असल्याचं राज्य सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी याआधीच सांगितलं आहे. या वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे भीतीचं वातावरण असलं तरी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मृत्यूदरांत झालेली घट हा त्यातील दिलाश्याचा भाग आहे.

    follow whatsapp