बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘गुलाब’ नाव कुणी दिलं?

मुंबई तक

• 03:17 AM • 26 Sep 2021

निसर्ग आणि तौतेनंतर आणखी एका चक्रीवादाळाचा भारताला तडाखा बसणार आहे. यापूर्वीची दोन्ही चक्रीवादळांचा थेट महाराष्ट्रावर परिणाम झाला होता. तर आता घोंगावत असलेलं चक्रीवादळ आंध्र प्रदेश व द ओडिशाच्या किनारापट्टीला धडकणार आहे. या चक्रीवादळाला गुलाब हे नाव देण्यात आलं आहे. हे नाव कुणी दिलं आणि चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात याबद्दल जाणून घेऊयात… भारतात आणि जगभरात […]

Mumbaitak
follow google news

निसर्ग आणि तौतेनंतर आणखी एका चक्रीवादाळाचा भारताला तडाखा बसणार आहे. यापूर्वीची दोन्ही चक्रीवादळांचा थेट महाराष्ट्रावर परिणाम झाला होता. तर आता घोंगावत असलेलं चक्रीवादळ आंध्र प्रदेश व द ओडिशाच्या किनारापट्टीला धडकणार आहे. या चक्रीवादळाला गुलाब हे नाव देण्यात आलं आहे. हे नाव कुणी दिलं आणि चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात याबद्दल जाणून घेऊयात…

हे वाचलं का?

भारतात आणि जगभरात सातत्यानं चक्रीवादळ निर्माण होतात. त्यामुळे निरनिराळ्या देशात धडकणारी चक्रीवादळं आणि चक्रीवादळांना देण्यात आलेली नावं हाही रंजक आणि समजून घेण्यासारखा विषय आहे.

चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात?

चक्रीवादळांना देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे चक्रीवादळाला नाव दिलं की, त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणं आणि लक्षात ठेवणं सोयीचे आणि सोप जातं. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या-ज्या देशांना बसण्याची शक्यता असते, ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात.

फुलं, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावांची यादी तयार केली जाते आणि क्रमाक्रमाने ती नावं वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदिव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत.

भारताकडून अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू अशी आठ नावे सुचवली गेली. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात आली. ही नावे ओळीने देण्यात येतात. २०१६ मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या एका वादळाला ‘क्यांत’ हे म्यानमारनं दिलं होतं. तर ओमाननेही यादीतील ४५ व्या चक्रीवादळाला ‘नाडा’ हे नाव सूचवलं होतं.

याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

Cyclone Gulab : महाराष्ट्रावर आता ‘गुलाबी’ संकट; कोणत्या जिल्ह्यांत जाणवणार परिणाम?

गुलाब नाव कोणत्या देशाचं?

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला गुलाब हे नाव देण्यात आलं असून, ते पाकिस्ताननं ठरवलेलं आहे. २०२० मध्ये महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. निसर्ग हे नाव बांगलादेशचं होतं. तर यावर्षी महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून घोंगावत गेलेल्या आणि गुजरातच्या किनारपट्टीला धडकलेल्या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमारनं ठरवलेलं होतं.

    follow whatsapp