मुंबई: शिंदे सरकारचा अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. गेल्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच काम करत होते. आता या शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांचे शिक्षण किती हे आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
१९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली त्यामध्ये काही जण दहावी पास तर काही जणांचे एमबीबीएसचे शिक्षण झालेले आहे. सध्याच्या सरकारचा पेच हा कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल अजून यायचा आहे. शपथविधी होण्याअगोदर विरोधी पक्ष सतत टीका करत होते की कोर्टाच्या निकालामुळे शपथविधी लांबवला जात आहे. आता शपथविधी झालेला आहे, कोणाकडे कोणते मंत्रिपद जाईल हे अजून निश्चित झालेले नाही.
शिंदे गटातील मंत्र्यांचे शिक्षण किती?
* गुलाबराव पाटील (पदवीधर)
* दादा भुसे (सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा)
* दीपक केसरकर (पदवीधर)
* संदिपान भूमरे (दहावी)
* उदय सामंत (सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा)
* तानाजी सावंत (प्राध्यापक)
* अब्दुल सत्तार (पदवीधर)
* शंभूराज देसाई (बारावी)
भाजपच्या मंत्र्यांचे शिक्षण किती?
* राधाकृष्ण विखे पाटील (कृषी विद्यापीठाचे पदवीधर)
* गिरीष महाजन (B.Com)
* चंद्रकांत पाटील (B.A)
* सुधीर मुनगंटीवार (M.Com, LLB, M.Phill)
* सुरेश खाडे (वेल्डिंग डिप्लोमा)
* डॉ. विजयकुमार गावित (MBBS, MD)
* रवींद्र चव्हाण (दहावी)
* अतुल सावे (पदवीधर)
* मंगल प्रभात लोढा (LLB)
१० ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार अधिवेशन
विधिमंडळाचे रखडलेले पावसाळी अधिवेशन येत्या १० ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाकडून १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे कार्यालयीन आदेश जारी करण्यात आले आहेत. आगामी अधिवेशन या कालावधीत असल्यामुळे सुट्ट्या रद्द करून हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT