Sanjay Dutt अचानक मंत्री नितीन गडकरी आणि नितीन राऊतांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 11:10 AM • 06 Jun 2021

नागपूर: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची आज (6 जून) थेट नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान, संजय दत्तच्या या नागपूर दौऱ्याबाबत फारच गुप्तता पाळण्यात आली होती. सुरुवातीला संजय दत्त याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या […]

Mumbaitak
follow google news

नागपूर: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची आज (6 जून) थेट नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान, संजय दत्तच्या या नागपूर दौऱ्याबाबत फारच गुप्तता पाळण्यात आली होती. सुरुवातीला संजय दत्त याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बेझनबाग येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

हे वाचलं का?

संजय दत्त यांच्या सोबतचे फोटो ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याने शेयर केले आहेत. नितीन राऊत यांची भेट घेतल्यानंतर संजय दत याने तात्काळ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वर्धा रोड येथील घरी भेट दिली. इथे संजय दत्त याने नितीन गडकरी यांना वाकून नमस्कार देखील केला. या भेटीचे देखील फोटो आता समोर आले आहेत.

दरम्यान, या भेटीचा आणि दौऱ्याचा नेमका तपशील जरी कळू शकला नसला तरी संजय दत्त यांचे जवळचे मित्र संजय दुबे यांनी मुंबई तकशी बोलताना इतकेच सांगितले की, हा त्यांचा खासगी दौरा होता. ही फक्त सदिच्छा भेट होते. त्यामुळे ही भेट झाल्यानंतर ते मुंबईला परतले आहेत.

अभिनेता संजय दत्तला UAE सरकारकडून मिळाला Golden Visa

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त हा शनिवारीच नागपूरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्याने या दोन्ही नेत्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

संजय दत्त याने या दोन्ही नेत्यांची त्यांच्या घरी जाऊन का भेट घेतली? याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान संजय दत्तची नेमकी काय चर्चा झाली हे मात्र, अद्याप समजू शकलेलं नाही.

दुसरीकडे ही फक्त सदीच्छा भेट असल्याचं जरी म्हटलं गेलं असलं तरी या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती? याविषयी राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

नितीन गडकरी चुकीच्या पक्षातला चांगला माणूस – अशोक चव्हाण

दरम्यान, राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलाचा लग्न सोहळा 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नितीन राऊतांनी आपल्या मुलाचा लग्न सोहळा रद्द करुन घरगुती पद्धतीने कार्यक्रम उरकला होता.

यामुळे अनेक मान्यवरांना या लग्न सोहळ्याला उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे संजय दत्तने आजच्या या भेटीत नितीन राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच त्याने नवदाम्पत्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

संजय दत्तला UAE सरकारकडून मिळाला Golden Visa

दरम्यान, नुकतंच संजय दत्त याला UAE सरकारकडून Golden Visa मिळाला आहे. संजय दत्तने याबाबतची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून दिली होती. एवढंच नाही तर गोल्डन व्हिसा दिल्याबद्दल संजय दत्तने युएई सरकारचे आभारदेखील मानले होते.

संजूबाबाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना एक फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये GDRFA दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अली मर्रि हे अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा देत असल्याचं दिसून आलं होतं.

    follow whatsapp